फ्लेक्स लावण्याची परवानगी न घेणाऱ्या १४ जणांवर गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:40 IST2021-04-01T04:40:53+5:302021-04-01T04:40:53+5:30
सातारा : शहरात गेल्या आठ दिवसांपासून ठिकठिकाणी वाढदिवस, विविध स्कीमच्या माहितीचे फ्लेक्स लावून विद्रुपीकरण केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात ...

फ्लेक्स लावण्याची परवानगी न घेणाऱ्या १४ जणांवर गुन्हे
सातारा : शहरात गेल्या आठ दिवसांपासून ठिकठिकाणी वाढदिवस, विविध स्कीमच्या माहितीचे फ्लेक्स लावून विद्रुपीकरण केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात १४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
किरण जगदाळे, निशांत धैर्यशील पाटील (रा. सदरबझार), बबलू सोळंकी (रा. सदरबझार), साईराज कदम, तेजस शशिकांत शिंदे (रा. ल्हासुर्णे फाटा, ता. कोरेगाव), राहुल शिंदे (रा. पाटखळ, ता. सातारा), अमित पवार, मिलिंद लक्ष्मण कदम (रा. खेड), सतीश नामदेवराव चव्हाण (रा. महागाव ता. सातारा), सुरज अरुण यादव (रा. करंजे), अण्णासाहेब ऊर्फ शेखर मोरे, सरिता संभाजी इंदलकर (रा. कळंबे, ता. सातारा), अक्षय गवळी (रा. गुरुवार पेठ), अभिषेक चव्हाण (रा. विलासपूर, सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
संशयितांनी मुथा चौक, कनिष्क मंगल कार्यालय चौक, सैनिकनगर चौक, वाढे फाटा चौक, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, अजंठा चौक, खेड फाटा चौक, गोडोली नाका, पंचायत समिती पोवई नाका, कमानी हौद, शिवराज तिकाटणे येथे संबंधित फ्लेक्स लावले होते. या सर्व कारवाया गेल्या तीन दिवसांमध्ये करण्यात आल्या आहेत.
फ्लेक्सबाबत परवानगी न घेणे, परवानगी घेतल्यानंतर वेळेत फ्लेक्स न काढले गेल्याचे समोर आले. नगरपालिकेप्रमाणेच पोलिसांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र या नियमांचे उल्लंघन झाल्याचे समोर आल्याने कारवाईचा बडगा उगारण्यात आला.