विनामास्क फिरणाऱ्या सातजणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:37 IST2021-05-15T04:37:22+5:302021-05-15T04:37:22+5:30

सातारा : शहरात विनामास्क फिरून जिल्हाधिकारी आदेशाचा भंग केल्याने सातारा शहर पोलिसांनी सात जणांवर गुन्हा नोंद केला. याबाबत पोलिसांनी ...

Crime on seven people walking around without masks | विनामास्क फिरणाऱ्या सातजणांवर गुन्हा

विनामास्क फिरणाऱ्या सातजणांवर गुन्हा

सातारा : शहरात विनामास्क फिरून जिल्हाधिकारी आदेशाचा भंग केल्याने सातारा शहर पोलिसांनी सात जणांवर गुन्हा नोंद केला. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध लागू केले आहेत. तरीही कमानी हौद परिसरात तिघेजण आदेशाचा भंग करून विनामास्क फिरताना आढळून आले. त्यामुळे अर्जुन किसन खवले (रा. प्रतापगंज पेठ, सातारा), संजय यशवंत सपकाळ (रा. शाहूनगर, सातारा) आणि नंदकुमार श्रीराम मुळीक (रा. करंजे पेठ, सातारा) यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी हवालदार प्रकाश कुंभार यांनी तक्रार दिली आहे.

दरम्यान, पोवई नाका परिसरात फिरणाऱ्या विकास किसन किरवे (रा. रहिमतपूर), प्रदीप दत्तात्रय पवार (रा. कोडोली, सातारा), आप्पासाहेब एकनाथ पाटील (रा. आनंदनगर, सातारा) आणि अन्य एकावर विनामास्क फिरल्याने कारवाई करण्यात आली. याप्रकरणी हवालदार मनोहर भोसले यांनी तक्रार दिली आहे.

...........................................................

Web Title: Crime on seven people walking around without masks