गुन्हे प्रतिबंध अन् उघडकीस आणणारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 10:59 PM2019-12-21T22:59:05+5:302019-12-21T23:04:33+5:30

आपल्या आजूबाजूला काय घडतंय, यावर प्रत्येकाचं लक्ष असायला हवं. पोलिसांचे कान, नाक, डोळा ही सर्वसामान्य जनताच आहे. - सर्जेराव पाटील, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा सातारा.

Crime prevention and disclosure | गुन्हे प्रतिबंध अन् उघडकीस आणणारच

गुन्हे प्रतिबंध अन् उघडकीस आणणारच

googlenewsNext
ठळक मुद्देमुंबईतील डिटेक्शनचा अनुभव येणार कामी चर्चेतील व्यक्तीशी थेट संवाद

दत्ता यादव।
सातारा : नवी मुंबई आणि ठाणे येथील क्राईम ब्रँचमधील डिटेक्शनचा अनुभव पाठीशी असल्यामुळे साताऱ्यात काम करणे फार अवघड जाणार नाही. तेथील अनुभव इथे कामी येणार आहे. गुन्हे उघडकीस आणणे आणि गुन्हेगारांवर ्रवचक ठेवून त्यांच्यावर प्रतिबंध घालणे हे धोरण साताºयात राबविले जाणार आहे. यासंदर्भात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्याशी केलेली बातचित..

  • प्रश्न : स्थानिक गुन्हे शाखेच्या संदर्भात तुमचे धोरण काय असणार?

उत्तर : गुन्हे डिटेक्शनवर भर दिला जाणार आहे. सातारा जिल्ह्यात गावोगावी खबऱ्यांचे नेटवर्क पुन्हा नव्याने उभारले जाणार आहे. तसेच गुन्हे घडू नयेत, यासाठी प्रतिबंधात्मक कारवाईवर भर दिला जाणार आहे. गुन्हे उघडकीस आणताना त्या गुन्ह्याच्या मुळापर्यंत गेले पाहिजे. तर त्याची उकल होते. या धोरणाला प्राधान्य असेल.

  • प्रश्न : तुमच्या शाखेकडे कोणते गुन्हे सध्या डिटेक्शनसाठी आहेत?

उत्तर : अलीकडे आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये प्रचंड वाढ होत आहे. गुन्हे घडल्यानंतर त्याचा शोध लावण्यापेक्षा ते घडूच नयेत, यासाठी जनजागृतीद्वारे प्रयत्न केले जाणार आहेत. फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये मोठी अफरातफर असते. याचा बारकाईने तपास करावा लागतो. जिल्ह्यात खासगी सावकारीचेही प्रमाण दिसत आहे. हे रोखण्यासाठी कारवाईचे कडक धोरण अवलंबले जाणार आहे.

  • प्रश्न : एलसीबीकडे सध्या पुरेसे मनुष्यबळ आहे का?

उत्तर : हो नक्कीच आहे. साताºयाची एलसीबीची टीम अत्यंत संवेदनशील आहे. या टीमचे नेटवर्क वाखाण्याजोगे आहे. तळागाळातील लोकांशी असलेला संपर्क आणि गुन्हे उघडकीस आणण्याच्या पद्धतीमुळे ही टीम क्रियाशील वाटते. कोणतेही काम टीमवर्कने केल्याने त्याचा आनंद घेता येतो. ही टीम नक्कीच गुन्हेगारांचा कर्दनकाळ ठरेल. आगामी काळात सर्वांना सोबत घेऊन त्यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून जिल्ह्यातील गुन्हेगारांचे जाळे शोधून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.

राष्ट्रपती पोलीस पदकही..
पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील हे बार्शी, सोलापूरहून साताºयात आले आहे. यापूर्वी त्यांनी मुंबई, ठाणे, बारामती, पुणे या ठिकाणी उत्कृष्ट काम केले आहे. याची दखल घेऊन त्यांना राष्ट्रपती पोलीस पदकही बहाल करण्यात आले आहे. तसेच उत्कृष्ट डिटेक्शनमुळे पोलीस महासंचालकांकडून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. मुंंबईसारख्या महानगरामध्ये काम करीत असताना त्यांनी ७५ रॉबरीपैकी ५३ गुन्हे उघडकीस आणले होते. इतरांचा तपास सुरू असून त्याला लवकरच यश येईल.

अकरा आरोपींना सक्तमजुरीची शिक्षा
ठाणे मध्यवर्ती बँकेतून सहा लाखांची रोकड चोरीस गेली होती. त्यामध्ये अकरा आरोपींना त्यांनी शिताफीने पकडले होते. या अकराही आरोपींना सक्तमजुरीची शिक्षा न्यायालयाने सुनावली होती. तसेच हिंगोली जिल्ह्याातील वसमत हे पोलीस ठाणे अत्यंत सेंसिटिव्ह आहे. या ठिकाणीही पाटील यांनी काम केले आहे. विविध आंदोलने त्यांनी कसलीही हिंसा न होता उत्कृष्टरीत्या हातळली आहेत.

Web Title: Crime prevention and disclosure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.