विनाकारण फिरणाऱ्या नऊजणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:38 IST2021-05-10T04:38:58+5:302021-05-10T04:38:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोना महामारीत विनाकारण दुचाकी फिरवून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर सातारा शहर पोलिसांनी कारवाईचा सपाटा ...

विनाकारण फिरणाऱ्या नऊजणांवर गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोरोना महामारीत विनाकारण दुचाकी फिरवून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर सातारा शहर पोलिसांनी कारवाईचा सपाटा लावला आहे. बॉम्बे रेस्टॉरंट चौकात फिरणाऱ्या नऊजणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सातारा येथे बॉम्बे रेस्टॉरंट चौकात विनाकारण फिरणाऱ्यांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. प्रवीण सखाराम निकम (४१, रा. सुंदरा गार्डन, बिल्डींग नंबर ३, सातारा), उमेश कुमार बृहस्पती (२३, रा. महागाव, ता. सातारा), दत्तात्रय मारुती गायकवाड (रा. खेड, सातारा) अशी त्यांची नावे आहेत. हे सर्वजण सार्वजनिक रस्त्यावर दुचाकी चालवून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन कररत होते. याबाबतची तक्रार पोलीस हवालदार शशिकांत भोसले यांनी दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार भिसे करीत आहेत.
दरम्यान, याच परिसरात आणखी एक कारवाई झाली आहे. यावेळी पोलिसांनी देवीदास श्रीराम वालके (४६, रा. भूविकास बँकेजवळ, करंजे, सातारा), सुशील दिलीप खवळे (२३, रा. संगमनगर, सातारा), शेखर विठ्ठल पवार (२४, रा. विकासनगर, ज्ञानभारती शाळेजवळ, विसावा बिल्डींग, सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची तक्रार पोलीस नाईक संदीप आवळे यांनी दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार कारळे करीत आहेत. तिसऱ्या कारवाईत मोहन दाजीराम गलांडे (५६, रा. देवकरवाडी, देगाव, निगडी, ता. सातारा), राजेश सुरेश पानस्कर (३४, रा. चिंचणेर, ता. सातारा), जावेद अकबर डांगे (३६, रा. कुडाळ, ता. जावळी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबतची तक्रार पोलीस नाईक अब्दुल खलिफा यांनी दिली असून अधिक तपास पोलीस हवालदार भिसे करीत आहेत.