कुसरुंडमधील १६ जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:39 IST2021-04-27T04:39:55+5:302021-04-27T04:39:55+5:30

याबाबत पाटण पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खासगी व सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली ...

Crime filed against 16 persons in Kusrund | कुसरुंडमधील १६ जणांवर गुन्हा दाखल

कुसरुंडमधील १६ जणांवर गुन्हा दाखल

याबाबत पाटण पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खासगी व सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. गर्दी टाळण्यासाठी शासनाकडून कोविड नियमांचे कठोर पालन करण्याच्या सूचनाही वारंवार दिल्या जात आहेत. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांकडून गावोगावच्या यात्रांवरही बंदी घालण्यात आली आहे; मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करत शनिवार,२४ रोजी कुसुरूंड, ता. पाटण येथील कमिटीने ग्रामदेवतेची पालखी काढून कोविड नियमांची पायमल्ली केली होती.

याप्रकरणी कुसरूंड येथील अधिक प्रभाकर सुतार, मारुती पांडुरंग कोळेकर, संतोष आनंदा पवार, चंद्रकांत पवार, ज्ञानदेव चंदू शिंदे, नथुराम रामचंद्र कांबळे, भानुदास यशवंत सुतार, तानाजी जगन्नाथ शिंदे, मधुकर साधू शिंदे, श्रीरंग रामचंद्र पवार, मारुती आनंदा शिंदे, संपत केशव गुरव, नामदेव रामचंद्र कुंभार, तुकाराम विठ्ठल कुंभार, संजय रामचंद्र मोरे, मुबारक यासिन शेख (सर्व रा. कुसरुंड) यांच्यावर पाटण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याचा अधिक तपास पोलीस हवालदार ए. एन. आवाड करीत आहेत.

Web Title: Crime filed against 16 persons in Kusrund