अपघातप्रकरणी कारचालकावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:43 IST2021-07-14T04:43:28+5:302021-07-14T04:43:28+5:30
सातारा : साताऱ्याहून कोरेगावला कारने जात असताना समोरून येणाऱ्या कारने धडक देऊन दोघांना जखमी व कारचे नुकसान केल्याप्रकरणी सातारा ...

अपघातप्रकरणी कारचालकावर गुन्हा
सातारा : साताऱ्याहून कोरेगावला कारने जात असताना समोरून येणाऱ्या कारने धडक देऊन दोघांना जखमी व कारचे नुकसान केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात अविनाश रामचंद्र निकम (वय ४१, रा. चिंधवली, ता. वाई) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अनिल तात्यासाहेब चव्हाण (वय ५०, रा. वेळेकामठी, ता. सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. दि. ९ रोजी दुपारी दीडच्या सुमारास अनिल चव्हाण आणि त्यांचा मुलगा कारने साताऱ्याहून कोरेगावला निघाले होते. महागाव, ता. सातारा जवळ समोरून आलेल्या कारने चव्हाण यांच्या कारला डाव्या बाजूस जोरदार धडक दिली. यामध्ये चव्हाण पिता-पुत्र जखमी झाले तर त्यांच्या कारचे नुकसान झाले. या प्रकरानंतर त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन कार चालक अविनाश निकम यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. याबाबत अधिक तपास पोलीस हवालदार कारळे हे करत आहेत.