विवाहितेचा विनयभंग, मारहाणप्रकरणी युवकावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:38 IST2021-02-13T04:38:21+5:302021-02-13T04:38:21+5:30
वाई : एका विवाहित महिलेला ‘तू मला खूप आवडेत,’ असे म्हणून कृष्णा नदीच्या घाटावर विकास विजय हगवणे याने ...

विवाहितेचा विनयभंग, मारहाणप्रकरणी युवकावर गुन्हा
वाई : एका विवाहित महिलेला ‘तू मला खूप आवडेत,’ असे म्हणून कृष्णा नदीच्या घाटावर विकास विजय हगवणे याने अडवून हात पकडला. त्या महिलेने पतीला घरी सांगितले. त्यावरून चिडून जाऊन दि. ११ रोजी सकाळी साडेनऊ वाजता विजय हगवणे याने त्या महिलेला व तिच्या पतीला लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची फिर्याद वाई पोलीस ठाण्यात दाखल झालेली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, विवाहित महिलेच्या मुलाला एका ठिकाणी क्लास लावला आहे. त्याच क्लासचालकाच्या घरातील विकास विजय हगवणे हा युवकाने ती महिला कृष्णा घाटावर धुणे धुण्यास दि. १० रोजी सायंकाळी ४ वाजता गेली होती. तेव्हा विकास याने तिला अडवून ‘तू मला खूप आवडतेस’ अशी विचारणा केली. त्यावर त्या महिलेने ‘माझे लग्न झाले आहे,’ असे म्हटले तरीही त्याने तिला अडवून छेडछाड केली. धुणे धुवून परत जातानाही त्याने अडवून हात पकडला. त्या महिलेने घरी जाऊन त्याच्या आईला सांगितले. सायंकाळी घरात कपडे वाळत घालत असताना मारहाण करून निघून गेला. ही बाब त्या महिलेने पतीला सांगितली. विकासच्या आईने आणि भावाने घरी येऊन माफी मागितली होती. परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी विकासने लाकडी दांडक्याने पती-पत्नीला मारहाण केली. याची नोंद वाई पोलीस ठाण्यात झाली आहे.