पाचगणीच्या नगसेवकावर धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा
By Admin | Updated: December 25, 2014 00:10 IST2014-12-24T22:18:10+5:302014-12-25T00:10:07+5:30
शिवीगाळ करीत पट्टा व लोखंडी गजाने मारहाण

पाचगणीच्या नगसेवकावर धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा
पाचगणी : पाचगणीचे माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक संतोष प्रभू कांबळे यांच्यावर पाचगणी पोलीस ठाण्यात धमकी दिल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत तक्रारदार भाग्येश अनिल बगाडे (वय २०, रा. भीमनगर, पाचगणी) यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, वाहनतळावर आपल्या गाडीत (एमएच १२ एएक्स ७४९७) बसले असता, गाडीच्या पाठीमागे संतोष कांबळे व त्यांचे सासरे जयवंत कुशाबा बगाडे यांनी आपली गाडी लावली. तसेच खाली उतरून ‘गाडी उघड’ असा दम दिला. ‘मी गाडीचे दार उघडत नाही, असे पाहून त्यांनी गाडीच्या समोरच्या, पाठीमागच्या आणि दोन्ही दरवाजांच्या काचा फोडल्या व मला शिवीगाळ करीत पट्टा व लोखंडी गजाने मारहाण केली. माझ्या गाडीचे नुकसान झाले असून मला मारण्याचा प्रयत्न संतोष कांबळे व जयवंत बगाडे या दोघांनी केला आहे. तसेच मला ‘तुझ्याकडे बघून घेतो,’ अशी धमकीही दिली, असे भाग्येश बगाडे यांनी तक्रारीत म्हटले आहे. (वार्ताहर)