वाहतूक कोंडी करणाऱ्या तीस जणांवर गुन्हा
By Admin | Updated: January 21, 2015 23:50 IST2015-01-21T22:14:45+5:302015-01-21T23:50:40+5:30
--‘लोकमत’चा दणका

वाहतूक कोंडी करणाऱ्या तीस जणांवर गुन्हा
सातारा : शहरातील रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी करून बेफामपणे दुचाकी चालवून गोंधळ घालणाऱ्या तीस जणांवर मंगळवारी रात्री उशिरा सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुनील पवार यांनी तक्रार दिल्यानंतर हा गुन्हा दाखल झाला. दरम्यान, याबद्दल ‘लोकमत’ने वृत्त प्रसिध्द केले होते. त्यानंतर कारवाई झाली.
सातारा शहर पोलीस ठाण्यातून देण्यात आलेल्या माहितीनुसार, अमोल जाधव, किशोर गालफाडे, शुभम निकम, तौसिफ शेख, श्रीकांत निकम, नीलेश सोनावणे, अभिषेक मोरे, गणेश कोतवाल, शाहरुख पठाण, आरिफ मुल्ला, सुरेश खाग, अरविंद घाडगे, अर्जुन घाडगे, विजय घाडगे, सुनील जाधव, अनिल जाधव, बबलू घाडगे, सोमा गोसावी, मनोज घाडगे, विनोद घाडगे, किरण कुऱ्हाडे, पंडित जाधव, संतोष जगताप, गोट्या, ओमान मोदी, आकाश पाटोळे, मयूर लाड, प्रथमेश कांबळे, मुस्तफा कच्छी याच्यासह साठ ते सत्तर जणांनी वाहतूक शाखेची परवानगी न घेता रॅली काढली. परिणामी वाहतुकीस अडथळा झाला. (प्रतिनिधी)