कण्हेर येथे मारहाणप्रकरणी सातजणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:40 IST2021-04-27T04:40:43+5:302021-04-27T04:40:43+5:30

सातारा : तालुक्यातील कण्हेर येथे जुन्या भांडणाचा राग मनात धरून झालेल्या मारामारीप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात परस्पर तक्रारीवरून सातजणांवर ...

Crime against seven persons in Kanher assault case | कण्हेर येथे मारहाणप्रकरणी सातजणांवर गुन्हा

कण्हेर येथे मारहाणप्रकरणी सातजणांवर गुन्हा

सातारा : तालुक्यातील कण्हेर येथे जुन्या भांडणाचा राग मनात धरून झालेल्या मारामारीप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात परस्पर तक्रारीवरून सातजणांवर गुन्हा दाखल झाला.

याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी, विजय बाबूराव वाघमळे (वय ४१, रा. कण्हेर, ता. सातारा) हे व्यवसायाने पेंटर असून, त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, विक्रम कृष्णदेव वाघमळे याने जुन्या भांडणाचा राग मनात धरून माझ्या डोक्यात लोखंडी गज मारून मला जखमी केले. दरम्यान, ही मारहाण सुरू असताना विजय यांच्या घरातील लोक सोडविण्यास आले असता त्यांनाही मनोज धर्मा वाघमळे, नचिकेत निवृत्ती वाघमळे, महेश संजय वाघमळे या तिघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली. यावेळी त्यांना दमदाटी करून जिवे मारण्याची धमकीही दिली.

विजय वाघमळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून विक्रम वाघमळे, मनोज वाघमळे, नचिकेत वाघमळे, महेश वाघमळे या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस नाईक शिंदे करत आहेत.

दरम्यान, विक्रम कृष्णदेव वाघमळे (वय ३५, रा. कण्हेर) यांचा मत्स्य व्यवसाय असून, त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, विजय बाबूराव वाघमळे, उमेश बाबूराव वाघमळे, आलोक विजय वाघमळे (सर्व रा. कण्हेर) यांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून संगनमताने विक्रम यांच्या छाती, पाय, हात आणि डाव्या हाताच्या खांद्यावर लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केले. यावेळी शिवीगाळ, दमदाटीही करण्यात आली.

Web Title: Crime against seven persons in Kanher assault case