युवतीचा जबरदस्तीने गर्भपात करणाऱ्यावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:38 IST2021-01-25T04:38:51+5:302021-01-25T04:38:51+5:30
सातारा : एका अल्पवयीन मुलीस सज्ञान होईपर्यंत लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार करून तिला गोळ्या खायला लावून जबरदस्तीने ...

युवतीचा जबरदस्तीने गर्भपात करणाऱ्यावर गुन्हा
सातारा : एका अल्पवयीन मुलीस सज्ञान होईपर्यंत लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार करून तिला गोळ्या खायला लावून जबरदस्तीने गर्भपात करणाऱ्या एकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संबंधित मुलगी अल्पवयीन असताना नीलेश वसंत गवळी (रा. अंगापूर, ता. सातारा) याने तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. ती सज्ञान झाल्यावरही तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केले. दरम्यान, संबंधित मुलगी गर्भवती राहिल्यामुळे तिला गोळ्या देऊन जबरदस्तीने गर्भपात केला. हा संपूर्ण प्रकार ८ एप्रिल २०१६ ते दि. १३ जून २०२० या कालावधीत घडला आहे. याप्रकरणी संबंधित मुलीने सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर सहायक पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी घटनास्थळी भेट दिली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक देव हे करत आहेत.