पत्नी, मुलीला मारणाऱ्या वकिलावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:37 IST2021-04-19T04:37:00+5:302021-04-19T04:37:00+5:30
सातारा : शहरालगत असणाऱ्या गोडोली येथे राहणाऱ्या पत्नी आणि मुलीला मारहाण, शिवीगाळ करणाऱ्या वकील पती आणि त्याच्या मित्रावर ...

पत्नी, मुलीला मारणाऱ्या वकिलावर गुन्हा
सातारा : शहरालगत असणाऱ्या गोडोली येथे राहणाऱ्या पत्नी आणि मुलीला मारहाण, शिवीगाळ करणाऱ्या वकील पती आणि त्याच्या मित्रावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
ॲड. राजेश निकम आणि अमोल कुलकर्णी अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत. दरम्यान, गुन्हा दाखल झालेले दोघेही फरार झाले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गोडोली येथे राहणारी एक उच्चशिक्षित महिला तिच्या मुलीसमवेत राहते. ॲड. राजेश आनंदराव निकम (रा. रमाकांत टॉवर, यादोगोपाळ पेठ, सातारा) हे त्यांचे पती आहेत. दरम्यान, शुक्रवारी (दि. १६) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास संशयित ॲड. राजेश निकम आणि त्यांचा मित्र अमोल कुलकर्णी हे दोघेजण महिलेच्या गोडोलीतील घरी गेले. येथे आल्यानंतर राजेश यांनी पत्नी आणि मुलीला शिवीगाळ करीत त्यांच्या पोटात लाथा मारल्या.
या घटनेनंतर संबंधित वकिलाच्या पत्नीने सातारा शहर पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक रोकडे या अधिक तपास करीत आहेत.