साताऱ्यात ज्वेलर्स चालकावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:26 IST2021-07-21T04:26:16+5:302021-07-21T04:26:16+5:30

सातारा: शहरालगत असणाऱ्या संगमनगर येथील सियाराम ज्वेलर्स ही आस्थापना सुरु ठेवून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात ...

Crime against jewelers driver in Satara | साताऱ्यात ज्वेलर्स चालकावर गुन्हा

साताऱ्यात ज्वेलर्स चालकावर गुन्हा

सातारा: शहरालगत असणाऱ्या संगमनगर येथील सियाराम ज्वेलर्स ही आस्थापना सुरु ठेवून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात आस्थापना चालकावर गुन्हा दाखल झाला आहे. गुजाबा आनंदा शिंदे (वय ४७, रा. माने हाईट्स, संगमनगर, सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, कोरोना महामारीत सातारा जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला असून, याचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. सोमवार, दि. १९ रोजी सायंकाळी साडेसात वाजता सातारा सियाराम ज्वेलर्स ही आस्थापना सुरु असल्याचे पोलीस शिपाई विनायक मानवी (वय ३०) यांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर गुजाबा शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस हवालदार कारळे हे करत आहेत.

Web Title: Crime against jewelers driver in Satara