पत्नीच्या डोक्यात कोयता मारणाऱ्या पतीवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:35 IST2021-04-05T04:35:49+5:302021-04-05T04:35:49+5:30
सातारा : घरगुती खर्च, तसेच मुलाच्या उपचाराचे पैसे देण्याच्या कारणावरून झालेल्या वादावादीत पतीने पत्नीच्या डोक्यात कोयता मारून तिला जखमी ...

पत्नीच्या डोक्यात कोयता मारणाऱ्या पतीवर गुन्हा
सातारा : घरगुती खर्च, तसेच मुलाच्या उपचाराचे पैसे देण्याच्या कारणावरून झालेल्या वादावादीत पतीने पत्नीच्या डोक्यात कोयता मारून तिला जखमी केल्याची घटना सातारा शहरातील सदरबझार परिसरातील लक्ष्मीटेकडी येथे घडली. या प्रकरणी पतीवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आकाश माने असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, पूजा आकाश माने (वय २०, रा.सदरबझार, लक्ष्मीटेकडी, पालिका चाळीजवळ, सातारा) या एका हॉटेलमध्ये काम करतात. त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, पती आकाश हा घरगुती खर्च, तसेच मुलाच्या उपचारासाठी पैसे देत नाही. यावरून दोघांमध्ये भांडणे झाली. यावेळी आकाश याने शिवीगाळ करत डोक्यात कोयता मारला. यात त्या जखमी झाल्या. या घटनेनंतर पूजा यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर आकाशवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक वाघ हे करत आहेत.