विवाहितेचा जाचहाटप्रकरणी सासू, पतीवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:20 IST2021-02-05T09:20:14+5:302021-02-05T09:20:14+5:30
सातारा : विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पुण्यातील दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झालेले दोघेही ...

विवाहितेचा जाचहाटप्रकरणी सासू, पतीवर गुन्हा
सातारा : विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पुण्यातील दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झालेले दोघेही महिलेचे पती आणि सासू असून हरीष खिलारे, चंद्रभागा खिलारे असे त्यांची नावे आहेत. दरम्यान, पीडित विवाहिता सध्या सातारा येथे राहण्यास आहे.
याबाबत दिलेली माहिती अशी, शीतल हरीष खिलारे (वय ३१, सध्या रा. रविवार पेठ, सातारा. मूळ रा. डाईस प्लॉट गोलटेकडी, खिलारे वस्ती, पुणे ) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, पती हरीष दशरथ खिलारे याने चारित्र्याचा संशय घेत ‘तुला घरातील कामे व्यवस्थित करता येत नाहीत,’ असे म्हणून वारंवार शारीरिक आणि मानसिक छळ केला. शीतल यांना लाथाबुक्क्यांनी मारहाणही केली. सासू चंद्रभागा दशरथ खिलारे हिनेही शीतल यांना शिवीगाळ, दमदाटी करून मानसिक छळ केला. ‘तुला घरातील काम व्यवस्थित करता येत नाही,’ असे आरोपही केले. हा संपूर्ण प्रकार २००८ ते दि. २९ जानेवारी २०२१ या कालावधीत घडला.
याप्रकरणी शीतल यांनी पती हरीष आणि सासू चंद्रभागा या दोघांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.