विवाहितेच्या जाचहाटप्रकरणी पती, सासू-सासऱ्यावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:27 IST2021-06-18T04:27:33+5:302021-06-18T04:27:33+5:30

सातारा : विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पती, सासू व सासऱ्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ...

Crime against husband, mother-in-law in case of marital harassment | विवाहितेच्या जाचहाटप्रकरणी पती, सासू-सासऱ्यावर गुन्हा

विवाहितेच्या जाचहाटप्रकरणी पती, सासू-सासऱ्यावर गुन्हा

सातारा : विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पती, सासू व सासऱ्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सारिका तेजस फाळके (रा. निगडी प्राधिकरण जि. पुणे सध्या रा. जिहे, ता. सातारा) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पती तेजस फाळके, सासरे रणजित बाजीराव फाळके आणि सासू मालिनी फाळके (सर्व रा. निगडी प्राधिकरण जि. पुणे) यांनी जून २०१३ ते १५ एप्रिल २०२१ दरम्यान वेळोवेळी मंगलमूर्ती वाढेफाटा, सातारा आणि निगडी प्राधिकरण येथे फिर्यादीला उपाशीपोटी ठेवून घरगुती कारणावरून शारीरिक आणि मानसिक छळ केला. हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तसेच शिवीगाळ व दमदाटी केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी तिघांवरही गुन्हा दाखल झाला असून पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम तपास करत आहेत.

Web Title: Crime against husband, mother-in-law in case of marital harassment