विवाहितेच्या जाचहाटप्रकरणी पतीवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:48 IST2021-06-09T04:48:28+5:302021-06-09T04:48:28+5:30

सातारा : माहेरून पैसे आण म्हणून शिवीगाळ, दमदाटी करत पत्नीस मारहाण करून तिचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीवर सातारा तालुका पोलीस ...

Crime against husband in marital harassment case | विवाहितेच्या जाचहाटप्रकरणी पतीवर गुन्हा

विवाहितेच्या जाचहाटप्रकरणी पतीवर गुन्हा

सातारा : माहेरून पैसे आण म्हणून शिवीगाळ, दमदाटी करत पत्नीस मारहाण करून तिचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

संदीप संकपाळ असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव असून, सातारा तालुक्यातील सोनगाव तर्फ सातारा येथे ही घटना घडली.

याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी, प्रिया संदीप संकपाळ (वय २५, रा. सोनगाव तर्फ सातारा, ता. सातारा) यांना त्यांचे पती संदीप हणमंत संकपाळ हा माहेरुन पैसे आण म्हणून त्रास देत होता. मात्र, प्रिया या पैसे आणत नसल्याचे पाहून तो त्यांना वेळोवेळी शिवीगाळ, दमदाटी तसेच हाताने मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी देऊन जाचहाट करत होता. संदीप याने प्रिया यांना वेळप्रसंगी उपाशीपोटी ठेवून छळ केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. हा संपूर्ण प्रकार दि. १३ मार्च २०१७ ते दि. ७ जून २०२१ या कालावधीत घडला आहे. याबाबत प्रिया यांनी सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर संदीपवर गुन्हा दाखल झाला. अधिक तपास पोलीस हवालदार भोईटे हे करत आहेत.

Web Title: Crime against husband in marital harassment case