सरबत विक्रेत्याला मारहाण करणाऱ्या चौघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:38 IST2021-03-20T04:38:58+5:302021-03-20T04:38:58+5:30
सातारा : सातारा येथे तहसीलदार कार्यालयासमोर एका सरबत विक्रेत्याला मारहाण, धक्काबुक्की केल्याप्रकरणी चौघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

सरबत विक्रेत्याला मारहाण करणाऱ्या चौघांवर गुन्हा
सातारा : सातारा येथे तहसीलदार कार्यालयासमोर एका सरबत विक्रेत्याला मारहाण, धक्काबुक्की केल्याप्रकरणी चौघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी अधिक माहिती अशी की, याप्रकरणी अक्षय शिवगण, आफरीन शिवगण, पूजा सय्यद आणि जावेद सय्यद (सर्व रा. रविवार, पेठ, सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे, तर तानाजी बन्सी बडेकर (वय ४६, रा. रविवार पेठ, सातारा) यांनी तक्रार दिली आहे. बडेकर यांचा सरबत गाडा आहे. बुधवार, दि. १७ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास अक्षयने तानाजी बडेकर यांना सातारा तहसीलदार कार्यालयासमोर शिवीगाळ केली. यावेळी ''मला शिवीगाळ का केली,'' अशी विचारणा तानाजी बडेकर यांनी केली. त्यामुळे बडेकर यांना दमदाटी करत मारहाण करण्यात आली. यानंतर आफरीन शिवगण, पूजा सय्यद आणि जावेद सय्यद या तिघांनी बडेकर यांना दमदाटी करत धक्काबुक्की केली.
याप्रकरणी तानाजी बडेकर यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक मुजावर हे तपास करत आहेत.
..............................................................