मंदिराचे कलशारोहण करणाऱ्या चौघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:37 IST2021-08-29T04:37:51+5:302021-08-29T04:37:51+5:30
सातारा : कोरोना महामारीत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून कलशारोहण केल्याप्रकरणी वनवासवाडी येथील चौघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

मंदिराचे कलशारोहण करणाऱ्या चौघांवर गुन्हा
सातारा : कोरोना महामारीत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून कलशारोहण केल्याप्रकरणी वनवासवाडी येथील चौघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
भीमराव धर्मा लोखंडे, स्वप्नील बाळासाहेब लोखंडे, अनिल किसन लोखंडे, बाळासाहेब रामचंद्र लोखंडे (सर्व रा. वनवासवाडी, ता. सातारा), अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत सातारा शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मंदिर बंद ठेवण्याचा आदेश असतानाही गुन्हा दाखल झालेल्या चौघांकडून शुक्रवार, दि.२७ रोजी महालक्ष्मी मंदिर उघडून कलशारोहणाचा कार्यक्रम केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. यामुळे ही कारवाई करण्यात आली. याबाबतचा गुन्हा पोलीस नाईक राहुल खाडे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस नाईक गायकवाड हे करत आहेत.