मारहाणप्रकरणी पाचजणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:49 IST2021-09-16T04:49:12+5:302021-09-16T04:49:12+5:30
सातारा : भजनाच्या कार्यक्रमात झालेल्या शाब्दिक वादातून एकाला पाचजणांनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना सातारा तालुक्यातील कारी या गावात घडली. ...

मारहाणप्रकरणी पाचजणांवर गुन्हा
सातारा : भजनाच्या कार्यक्रमात झालेल्या शाब्दिक वादातून एकाला पाचजणांनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना सातारा तालुक्यातील कारी या गावात घडली.
सतीश जगन्नाथ अडागळे (वय ४७, रा. कारी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पाचजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निखिल धोंडवड, देवानंद धोंडवड (रा. आंबळे पो. कारी, ता. सातारा) यांच्यासह दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल झाला आहे. दि. ३ रोजी कारी गावामध्ये सायंकाळी भजनाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमामध्ये तात्या पिंपळे हे तेथे आले. यावेळी सतीश अडागळे हे पेटी वाजवत होते. या दोघांमध्ये किरकोळ कारणावरून शाब्दिक वाद झाला. या वादातून रात्री संबंधितांनी अडागळे यांच्या घरी जाऊन त्यांना मारहाण केली. तसेच जातिवाचक शिवीगाळ केल्याचेही अडागळे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.