जावयास मारहाण करणाऱ्या सासऱ्यावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:40 IST2021-03-17T04:40:04+5:302021-03-17T04:40:04+5:30
साताराः येथील सदरबझार परिसरात असणाऱ्या नवीन म्हाडा कॉलनीत आपली पत्नी आणि मुलीला भेटण्यास गेलेल्या जावयास सासऱ्याने आणि अन्य एकाने ...

जावयास मारहाण करणाऱ्या सासऱ्यावर गुन्हा
साताराः येथील सदरबझार परिसरात असणाऱ्या नवीन म्हाडा कॉलनीत आपली पत्नी आणि मुलीला भेटण्यास गेलेल्या जावयास सासऱ्याने आणि अन्य एकाने लोखंडी पाईपने मारहाण करुन जखमी केल्याची घटना रविवार, दिनांक १४ रोजी सायंकाळी साडेसात वाजता घडली. याप्रकरणी दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
किशोर बाळासाहेब कांबळे (वय ३४, रा. आझादनगर, शाहुपुरी, सातारा) हे सदरबझार येथील नवीन म्हाडा कॉलनीमध्ये पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी गेले होते. याचा राग आल्यामुळे त्यांना दगडू आवळे आणि प्रीतम आवळे (दोघे रा. नवीन म्हाडा कॉलनी, सदरबझार, सातारा) या दोघांनी किशोर यांना शिवीगाळ केली. यावेळी त्यांच्या डोक्यात लोखंडी पाईपने प्रहार करुन त्यांना जखमी केले. या घटनेनंतर किशोर यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर दगडू आणि प्रीतम या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस नाईक झेंडे या करत आहेत.