लाच मागितल्याचा मंडलाधिकाऱ्यावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:44 IST2021-08-25T04:44:09+5:302021-08-25T04:44:09+5:30
कराड : खरेदी गुंठेवारी प्लॉटची तलाठ्यांनी धरलेली नोंद प्रमाणित करण्यासाठी उंडाळे, ता. कराड येथील मंडलाधिकारी नागेश निकम याने २० ...

लाच मागितल्याचा मंडलाधिकाऱ्यावर गुन्हा
कराड : खरेदी गुंठेवारी प्लॉटची तलाठ्यांनी धरलेली नोंद प्रमाणित करण्यासाठी उंडाळे, ता. कराड येथील मंडलाधिकारी नागेश निकम याने २० हजारांची लाच मागितल्याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सांगली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खरेदी गुंठेवारी प्लॉटची तलाठ्यांनी धरलेली नोंद प्रमाणित करण्यासाठी संबंधित तक्रारदाराकडे उंडाळेचा मंडलाधिकारी नागेश निकम याने २७ हजारांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती २० हजारांची लाच देण्याचे ठरले. त्याबाबत संबंधित तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार मंडलाधिकारी नागेश निकम याच्याविरोधात सांगलीच्या पथकाने शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार, लाचेची मागणी केल्याबद्दलचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तलाठ्यांनी प्रमाणित केलेली नोंद कायम ठेवण्यासाठी तक्रारदाराकडे निकम याने लाच मागितल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सांगली येथील लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस निरीक्षक प्रशांत चौगुले यांच्या नेतृत्वाखाली हवालदार संजय संकपाळ, धनंजय खाडे, प्रीतम चौगुले, अजित पाटील, विना जाधव, बाळासाहेब पवार यांनी ही कारवाई केली.