महिलेच्या विनयभंग प्रकरणी दोघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 05:04 IST2021-05-05T05:04:55+5:302021-05-05T05:04:55+5:30

सातारा : तालुक्यातील एका गावात सासऱ्याला मारहाण सुरू असताना ती सोडविण्यासाठी गेलेेल्या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर सातारा तालुका पोलीस ...

Crime against both in the case of molestation of a woman | महिलेच्या विनयभंग प्रकरणी दोघांवर गुन्हा

महिलेच्या विनयभंग प्रकरणी दोघांवर गुन्हा

सातारा : तालुक्यातील एका गावात सासऱ्याला मारहाण सुरू असताना ती सोडविण्यासाठी गेलेेल्या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याबाबत अधिक माहिती अशी, पीडित महिला सातारा तालुक्यातील एका गावातील असून वैभव उर्फ विकी फाळके (पूर्ण नाव माहीत नाही. रा. सैदापूर, ता. सातारा), गणेश जाधव (पूर्ण नाव माहीत नाही. रा. मल्हार पेठ, सातारा) या दोघांनी दारू पिऊन आपापसात संगनमत करून ‘तुमचे पती घरात आहेत का,’ असे विचारत घरात प्रवेश केला. सासऱ्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी पीडित महिला त्यांना सोडविण्यास गेली असता तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. यावेळी त्यांना हाताने मारहाण करत शिवीगाळ, दमदाटी केली. याप्रकरणी पीडित महिलेने सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर वैभव उर्फ विकी फाळके आणि गणेश जाधव या दोघांवर गुन्हा दाखल झाला. रात्री उशिरापर्यंत या दोघांनाही अटक करण्यात आलेली नव्हती. अधिक तपास पोलीस नाईक शिंदे या करीत आहेत.

Web Title: Crime against both in the case of molestation of a woman