साताऱ्यात विनाकारण फिरणाऱ्या १६ जणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:39 IST2021-05-19T04:39:53+5:302021-05-19T04:39:53+5:30
सातारा : कोरोना महामारीत सातारा जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू झाला आहे. अशा परिस्थितीतही त्याचे उल्लंघन अनेकांकडून होत असल्यामुळे ...

साताऱ्यात विनाकारण फिरणाऱ्या १६ जणांवर गुन्हा
सातारा : कोरोना महामारीत सातारा जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू झाला आहे. अशा परिस्थितीतही त्याचे उल्लंघन अनेकांकडून होत असल्यामुळे पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. विनाकारण, विनापरवाना तसेच विनामास्क फिरणाऱ्यांवर कमानी हौद, मोती चौक, शाहू चौक, बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात सातारा शहर पोलीस आणि शाहूपुरी पोलिसांनी १६ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
कमानी हौद परिसरात असणारे ताज एक्स्प्रेस नावाची आस्थापना सुरू ठेवल्याप्रकरणी समीर शरीफ शेख (वय २४, रा. गुरुवार पेठ, सातारा) याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस कॉन्स्टेबल विशाल धुमाळ यांनी याची तक्रार दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार भिसे करत आहेत.
कमानी हौद परिसरात विनाकारण, विनापरवाना फिरणाऱ्या अरबाज सिराज शेख (वय २५, रा. गुरुवार पेठ, सातारा), हज्जेप फय्याज शेख (वय १८, रा. गुरुवार पेठ, सातारा) या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस नाईक अविनाश चव्हाण यांनी याची तक्रार दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार कारळे करत आहेत.
साताऱ्यातील शाहू चौकात विनाकारण फिरणाऱ्या कौस्तुभ चंद्रकांत खरे (वय २७, रा. गजानन सोसायटी बंगला, पी. डी. पाटीलनगर, कराड), ओंकार अशोक माने (वय २३, रा. मंगळवार पेठ, सातारा), अक्षय दिलीप पाटील (वय २०, रा. रविवार पेठ, कराड), किरण गुलाब गावित (वय ३०, रा. विद्यानगर, कराड), विक्रम पोपट जाधव (वय ३४, रा. डोराम हौसिंग सोसायटी, कोडोली, सातारा) या पाच जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस हवालदार दीपक कांबळे यांनी याची तक्रार दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार भिसे करत आहेत.
शाहू चौकात फिरणाऱ्या सौरभ राजेंद्र जाधव (वय २१, रा. गोवे, ता. सातारा), निरंजन रविकांत भंवर (रा. लिंब, ता. सातारा), अर्जुन मानसिंग शिंदे (वय २७, रा. लिंब, ता. सातारा), विशाल अरुण जाधव (वय २२, रा. लिंब, ता. सातारा) या चौघांवर गुन्हा दाखल झाला आह. पोलीस हवालदार दीपक कांबळे यांनी याची तक्रार दिली आहे. पोलीस हवालदार कारळे अधिक तपास करत आहेत.
सातारा वाहतूक शाखेचे सहायक फौजदार बाबासाहेब पवार यांनी दिलेल्या तक्रारीनंतर विनाकारण फिरणाऱ्या संतोष यशवंत राऊत (वय ३५, रा. आरेदरे, ता. सातारा) याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार कारळे करत आहेत.
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात विनाकारण, विनापरवाना फिरणाऱ्या अभिषेक जितेंद्र शिवदास (रा. सत्यमनगर, सातारा), जयराम मिर्झाराम वर्मा (रा. दौलतनगर, सातारा), दिनेश नामदेव माने (रा. आदित्यनगरी, सातारा) या तिघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस नाईक उदयसिंह जाधव यांनी याबाबतची तक्रार दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार कारळे करत आहेत.