जखमी चालकास क्रेनने बाहेर काढले

By Admin | Updated: May 25, 2014 00:33 IST2014-05-25T00:22:31+5:302014-05-25T00:33:30+5:30

मालट्रक-कार अपघात : सालपे घाटाच्या पायथ्याशी घडली घटना

Crane pulled out the injured driver | जखमी चालकास क्रेनने बाहेर काढले

जखमी चालकास क्रेनने बाहेर काढले

 तरडगाव : सालपे, ता. फलटण घाटाच्या पायथ्याला मालट्रक व कार यांच्यात शुक्रवारी रात्री आठ वाजता अपघात झाला. यामध्ये मालट्रक हा कारवर पलटी झाल्याने कारमध्ये सुमारे दोन तास मृत्यूशी झुंजणार्‍या चालकास क्रेन व जेसीबीच्या साह्याने बाहेर काढले. चालकास गंभीर दुखापत झाली असून, अन्य किरकोळ जखमी झाले. याप्रकरणी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला. शिर्डी देवदर्शन करून चणक्रिष्णच्या चरकुरी (रा. म्हैसूर) यांचे कुटुंब नीरा-सातारा रस्त्यामार्गे (केए ०९ झेड २५२६) या गाडीने परत निघाले होते. घाटाच्या पायथ्याशी आल्यावर लोणंदकडे भरधाव वेगात येणार्‍या (केए ४८ - २८९८) मालट्रकने दुसर्‍या एका ट्रकला ओव्हरटेक करून विरुद्ध बाजूला येऊन कारला जोरदार धडक दिली. अपघातात दोन्ही गाड्या रस्ता सोडून खाली उतरल्याने मालट्रक कारवर पलटी झाला. अपघातानंतर पोलीस व जमावाने घटनास्थळी येऊन गाडीतील कृष्णकुमारी कलवाकुरी, सुजाता कुलवाकुरी, साईगणेश चरकुरी, शिवशंकर कलवाकुरी, ऐश्वर्या चरकुरी, चेतना कलवाकुरी, अनुराधा चरकुरी यांना गाडीतून बाहेर काढले; परंतु गाडी चालकाच्या बाजूवर ट्रक पलटी झाल्याने तो गाडीत अटकून राहिला. गावकरी व प्रवाशांनी प्रसंगावधान दाखवित दोन-तीन ट्रॅक्टरच्या साह्याने ट्रकला तर क्रेन व दोन जेसीबीच्या साह्याने चालकास बाहेर काढले. चालकावर लोणंद येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. याबाबत सुमन चरकुरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रकचालक चन्नरिया पुजारी (रा. घोडकी, जि. बेळगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक फौजदार के. व्ही. धुमाळ तपास करत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Crane pulled out the injured driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.