शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

कोयनेचे दरवाजे पहाटे बंद, सकाळी उघडले; सातारा जिल्ह्यात पावसाची उघडीप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 17:27 IST

धरणात आवक कमी : पाणीसाठा १०५ टीएमसीवर

सातारा : जिल्ह्यात पावसाची उघडीप असून कोयना धरण पाणलोट क्षेत्रातही विश्रांती आहे. त्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाल्याने मंगळवारी पहाटेच्या सुमारास सहा दरवाजे बंद करून विसर्ग थांबविण्यात आला; पण सकाळी ११ च्या सुमारास पुन्हा दोन दरवाजांतून विसर्ग सुरू करण्यात आला आहे.जिल्ह्यात मागील आठवड्यात चांगला पाऊस झाला, तसेच पश्चिम भागातही जोरदार हजेरी लावली, तर कोयना धरण पाणलोट क्षेत्रातही दमदार पाऊस पडला होता. यामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू झाली. परिणामी, सुरुवातीला पायथा वीजगृहाची दोन्ही युनिट सुरू करून विसर्ग करण्यात आला. त्यानंतरही धरणात पाणी वाढत असल्याने सहा वक्र दरवाजे उघडण्यात आले. टप्प्याटप्प्याने दोन फुटांपर्यंत वर दरवाजे घेण्यात आले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत होता; पण चार दिवसांपासून कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची उघडीप आहे. त्यामुळे तीन दिवसांपूर्वी धरणाचे दरवाजे एक फुटावर खाली घेण्यात आले. त्यातच पाण्याची आवक आणखी मंदावल्याने मंगळवारी पहाटेच्या सुमारास धरणाचे दरवाजे पूर्ण बंद करून विसर्ग पूर्णपणे थांबविण्यात आलेला. मात्र, पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी पुन्हा सकाळी ११ वाजता धरणाचे दोन दरवाजे एक फुटाने उघडून विसर्ग सुरू करण्यात आला, तसेच धरणाच्या पायथा वीजगृहाची दोन्ही युनिटही सुरू असून त्यातून २ हजार १०० क्युसेक विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे धरणातून एकूण ५ हजार २८२ क्युसेक विसर्ग सुरू आहे. मंगळवारी सकाळच्या सुमारास धरणात सुमारे सहा हजार क्युसेक वेगाने पाणी येत होते, तर धरणात १०४.१४ टीएमसी पाणीसाठा होता.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKoyana Damकोयना धरणRainपाऊस