आठ जणांना न्यायालयीन कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:39 IST2021-04-07T04:39:24+5:302021-04-07T04:39:24+5:30
वडूज : हिंगणे, ता. खटाव येथील अजय चंद्रकांत यादव ( वय ४२ ) याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वडूज ...

आठ जणांना न्यायालयीन कोठडी
वडूज : हिंगणे, ता. खटाव येथील अजय चंद्रकांत यादव ( वय ४२ ) याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वडूज पोलीस ठाण्यात तेरा जणांवर गुन्हा दाखल करून आठ जणांना अटक करण्यात आली होती. या आठ जणांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावली.
याबाबत माहिती अशी की, हिंगणे ता. खटाव येथील अजय यादव यांनी त्यांच्या ओळखीतील लोकांना विविध कारणांसाठी एकूण रक्कम १९ लाख ९५ हजार रुपये दिले होते. मात्र संबंधितांनी त्यांचे पैसे न देता उलट त्यांनाच खोट्या केसमध्ये अडकविण्याची धमकी दिली होती. त्यामुळे अजय यादव याने बुधवार दि. ३१ मार्च रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घरासमोरील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येप्रकरणी १३ जणांवर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यापैकी इम्रान बागवान, विलास शिंगाडे, सुनील गायकवाड, जालिंदर खुडे, रवींद्र राऊत, अमित पिसे, धनाजी पाटोळे, अमोल कलढोणे यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर सोमवार दि. ५ रोजी त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने आठ जणांना न्यायालयीन कोठडी सुनावली.
दरम्यान, तेरापैकी उर्वरित पाच संशयित अद्याप फरार असून या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शीतल पालेकर हे करीत आहेत.