शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या कुरिअर बॉयवर कऱ्हाड येथे हल्ला; ७० लाखांचे दागिने लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 12:31 IST

एकजण ताब्यात

कऱ्हाड : वराडे (ता. कऱ्हाड) गावच्या हद्दीत एका हॉटेलनजीक मंगळवारी मध्यरात्री कोल्हापुरातील एका कुरिअर कंपनीच्या कुरिअर बॉयला मारहाण करून त्याच्याकडील सुमारे ७० लाखांचे दागिने असलेली बॅग चोरट्यांच्या टोळीने लंपास केल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी तळबीड पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून, त्याच्या साथीदारांचा शोध सुरू जात आहे. राहुल दिनकर शिंगाडे (वय २८, रा. शिंगणापूर, ता. माण), असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरातील कासार गल्लीतील कृष्णा कुरिअरकडून काही सोन्याचा ऐवज मुंबईला पाठविला जाणार होता. कंपनीतील कुरिअर बॉय प्रशांत शिंदे हे मंगळवारी रात्री एका बॅगमध्ये तो ऐवज घेऊन महामंडळाच्या कोल्हापूर ते मुंबई स्लिपर कोच बसने मुंबईला जाण्यासाठी निघाले. बस मध्यरात्री एकच्या सुमारास वराडे गावच्या हद्दीतील थांबली. त्याठिकाणी बसमधील सर्व प्रवासी खाली उतरले. कुरिअर बॉय प्रशांत शिंदे हेही सोन्याचा ऐवज असलेली बॅग सोबत घेऊन लघुशंकेसाठी उतरले. त्यानंतर ते परत बसमध्ये चढत असताना चोरट्यांच्या टोळीने त्यांच्यावर हल्ला केला. त्यांना मारहाण करीत सोन्याच्या ऐवजाची बॅग हिसकावली व चोरटे पसार झाले.याबाबतची माहिती मिळताच तळबीड पोलिस ठाण्याचे अधिकारी तसेच कर्मचारी त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी घटनेचा तपास सुरू केला. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी राहुल शिंगाडे या संशयिताला ताब्यात घेऊन अटक केले आहे. त्याच्याकडून साथीदारांची नावे निष्पन्न झाली असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.