शेतजमिनीस कुंपण घालण्यावरून दाम्पत्यावर पिस्तूल रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:47 IST2021-09-08T04:47:49+5:302021-09-08T04:47:49+5:30

सातारा : हिश्श्याच्या जमिनीस कुंपण घालण्यास गेलेल्या दाम्यत्यावर एकाने पिस्तूल रोखून चिंधड्या करण्याची धमकी दिल्याची खळबळजनक घटना वाइ तालुक्यातील ...

The couple stopped the pistol from fencing off the farmland | शेतजमिनीस कुंपण घालण्यावरून दाम्पत्यावर पिस्तूल रोखले

शेतजमिनीस कुंपण घालण्यावरून दाम्पत्यावर पिस्तूल रोखले

सातारा : हिश्श्याच्या जमिनीस कुंपण घालण्यास गेलेल्या दाम्यत्यावर एकाने पिस्तूल रोखून चिंधड्या करण्याची धमकी दिल्याची खळबळजनक घटना वाइ तालुक्यातील मेणवली येथे घडली. याप्रकरणी वाई पोलीस ठाण्यात दोघा भावंडांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रवीण लक्ष्मण भांडवलकर, विश्वजित लक्ष्मण भांडवलकर (रा. मेणवली, ता. वाई) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, यातील तक्रारदार शुभांगी भांडवलकर आणि त्यांचे पती सुजितकुमार भांडवलकर हे काही कामगारांना घेऊन त्यांच्या हिश्श्याच्या जमिनीस कुंपण घालण्यासाठी गेले होते. त्यावेळी प्रवीण भांडवलकर याने खिशातील पिस्तूल काढून भांडवलकर दाम्पत्यावर रोखले. त्यांना जिवे मारण्याची धमकीही त्याने दिली. मात्र, तेथे उपस्थित असलेल्या काही लोकांनी प्रवीण भांडवलकर याला बाजूला नेले. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. वास्तविक ही घटना जून महिन्यामध्ये घडली आहे. परंतु तक्रारदार महिलेने हे प्रकरण तंटामुक्तीमध्ये नेले होते. मात्र, तेथेही हे प्रकरण न मिटल्याने अखेर त्यांनी वाई पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.

Web Title: The couple stopped the pistol from fencing off the farmland