तीनशे विद्यार्थ्यांचे समुपदेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:44 IST2021-09-05T04:44:10+5:302021-09-05T04:44:10+5:30
सातारा : लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षापासून आजअखेर सर्व विद्यार्थी घरीच आहेत. ऑनलाईन पद्धतीने त्यांचे शिक्षण सुरू आहे. परिणामी मोबाईलचा वापर ...

तीनशे विद्यार्थ्यांचे समुपदेशन
सातारा : लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षापासून आजअखेर सर्व विद्यार्थी घरीच आहेत. ऑनलाईन पद्धतीने त्यांचे शिक्षण सुरू आहे. परिणामी मोबाईलचा वापर वाढला आहे. मुलांच्या हाती मोबाईल आल्यामुळे पालकांची डोकेदुखी वाढली आहे. मोबाईल गेम खेळणे, नको असलेले व्हिडिओज कुतूहलापोटी पाहणे, इतरांना पाठवणे, असे प्रकार वाढीस लागले आहेत. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना जागृती करणे तसेच पालकांना त्यांच्या जबाबदारीबाबत जाणीव करून देणे महत्त्वाचे बनले आहे. म्हणून येथील रयत शिक्षण संस्थेच्या रा. ब. काळे जीवन शिक्षण मंदिर, सातारा या शाळेतील पहिली ते सातवीच्या विद्यार्थी, पालकांसाठी पोलीसदीदीचे ऑनलाईन मार्गदर्शन ठेवण्यात आले होते. शाहूपुरी पोलीस स्टेशनच्या पोलीस हवालदार नीलम सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले. यात शाळेतील तीनशे विद्यार्थी तसेच पालक सहभागी झाले होते. पोलीस नाईक तुषार डमकले, मुख्याध्यापक अमोल कोळेकर, सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.