धरणाच्या दारातच बाटल्यांचा खच

By Admin | Updated: December 4, 2014 23:40 IST2014-12-04T22:37:14+5:302014-12-04T23:40:02+5:30

तारळी : परिसराची दयनीय अवस्था; प्रशासनाचे दुर्लक्ष

The cost of bottles in the dam's door | धरणाच्या दारातच बाटल्यांचा खच

धरणाच्या दारातच बाटल्यांचा खच

तारळी : तारळी धरणाच्या दोन्ही बाजूला दरवाजांना कुलपे लावली आहेत. धरणाच्या परिसरात अधिकारी, कर्मचारी आढळून येत नाहीत. पर्यटकांना कोणीही विचारणार नसल्याने धरणाची सुरक्षा रामभरोसे असल्याचे चित्र दिसत आहे. त्याचेच फलीत म्हणून धरणाच्या मुख्य गेटसमोरच नाल्यात दारु पिऊन बाटल्या टाकल्याने प्रशासनाचा बोंगळ कारभार समोर आला आहे. एका बाजूला धरणाच्या गळतीचा प्रश्न निर्माण झाला असून दुसरीकडे धरणाच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
तारळी धरणाच्या लोकार्पण सोहळ्याला वर्ष लोटले तरीही सुरुवातीचे काही दिवस वगळता धरणावर गेटवर कर्मचारी अथवा सुरक्षारक्षक आढळून येत नाही. त्यामुळे अतिउत्साही पर्यटक धरणाच्या भिंतीवर, गेटवर धोकादायक कवायती करताना आढळतात. प्रवाशांनी टोकण्याचा प्रयत्न केल्यास शुद्धीत नसल्याने पर्यटन त्यांनाच दुरुस्ती करतात. पावसाळ्याच्या दिवसांत तर अनेकांनी अक्षरश: रिंगरोडवर नंगा नाच घातला होता. कृष्णा खोरे सुस्त असल्याने धरणाच्या सुरक्षिततेचे तीन तेरा वाजले आहेत. धरणाच्या मुख्य गेटसमोरच्या नाल्यात आढळून येणाऱ्या दारुच्या बाटल्या परिस्थिती किती वाईट आहे हे दाखवत आहेत. यामुळे प्रशासनाचे धिंडवडे निघत आहे. यातून बोध धरणाच्या सुरक्षिततेबाबत काळजी घ्यावी, धरणावर कोण अधिकारी, कर्मचारी कधी येतो, कधी जातो, हे समजत नाही. हौशी पर्यटकांना चाप लावण्यासाठी, प्रवाशांच्या धरणाच्या सुरक्षिततेसाठी कृष्णा खोरेच्या अधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)



तारळी धरणाच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षकाची नेमणूक झाली असून लवकरच तो हजर होईल. मेनगेटच्या बाजूने कोणी धरणाच्या भींतीवर कोणी जाऊ नये, यासाठी टेक्निकल डीपार्टमेंटला सुचना व निधी उपलब्ध करून दिला आहे.
डी. ई. पाटेकर, उपअभियंता

Web Title: The cost of bottles in the dam's door

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.