शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

नगरसेवक, महसूल राज्यमंत्री ते धमाकेदार लोकप्रिय खासदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 23:55 IST

सातारा : छत्रपती घराण्याचे थेट तेरावे वंशज असलेल्या खासदार उदयनराजे भोसले यांनी कायम सर्वसामान्यांमध्ये मिसळून राहण्याचा प्रयत्न केला. राजकारणातील ...

सातारा : छत्रपती घराण्याचे थेट तेरावे वंशज असलेल्या खासदार उदयनराजे भोसले यांनी कायम सर्वसामान्यांमध्ये मिसळून राहण्याचा प्रयत्न केला. राजकारणातील त्यांचे उमेदवारीचे दिवस त्यांचीही सत्त्वपरीक्षा बघणारे होते. पण अनेक चढउतार आणि आरोपांच्या दिव्यातून गेल्यानंतर त्यांनी नगरपालिकेत एकहाती सत्ता घेतली. त्यानंतर गेल्या दीड दशकात त्यांनी मागे वळून पाहिले नाही. सामान्यांची नाळ ओळखून त्यांना घायाळ करणाऱ्या उदयनराजे यांच्यासमोर कुठलीच लाट टिकाव धरू शकत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.सातारा लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश संपादन केलेल्या खासदार उदयनराजे भोसले यांनी तरुण आणि सामान्य हे त्यांचे ‘फोकस’ ठेवले. सातारा नगरपालिकेतून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. पहिल्यांदा अपयश पचविल्यानंतर त्यांनी लोक आग्रहास्तव पुन्हा तालुक्यात लक्ष घालण्याचा प्रयत्न केला. पितृछत्र हरपल्यामुळे त्यांना राजकारणात कोणीच गॉडफादर नव्हता. त्यावेळी साताºयातील अनेक सामान्य कार्यकर्त्यांच्या जोरावर त्यांनी राजकारणात टिकण्याचा प्रयत्न केला. एकीकडे कुटुंबातील संघर्ष टोकावर असतानाच त्यांना भारतीय जनता पार्टीत गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे प्रवेश केला. भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवून त्यांना महसूल राज्यमंत्रिपद मिळविले. त्यानंतर १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्यावर खुनाचा आरोप झाला. त्यात २२ महिने ते सर्वांपासून दूर गेले. या खटल्यातून निर्दोष मुक्त झाल्यानंतर त्यांनी सातारा नगरपालिकेत २००१ सातारा विकास आघाडी स्थापन करून पॅनेल टाकले. त्यावेळी सहानुभूतीच्या लाटेत सत्तारुढ नगर विकास आघाडीला केवळ १ नगरसेवक मिळाला. नगराध्यक्षांसह तब्बल ३६ नगरसेवकांची फौज घेऊन उदयनराजे यांनी सातारा शहरावर राज्य केलं. त्यानंतर त्यांना आमदार म्हणून संधी मिळाली.उदयनराजे भोसलेखासदार, सातारा लोकसभा मतदारसंघ (वय : ५३)तरुणाईच्या गळ्यातील ताईत म्हणून परिचीतआई कल्पनाराजे भोसले, पत्नी दमयंतीराजे भोसले, मुलगा वीरप्रतापसिंहराजे, मुलगी नयनतारासातारा पालिका नगरसेवककृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्षमहसूल राज्यमंत्रीमी सर्व पक्षीय आहे...!उदयनराजे यांचा राजकीय प्रवास हा कायम पक्षविरहित राहिला आहे. सर्व पक्षात मित्रांचा गोतावळा असल्यामुळे ते कधीच कोणत्या पक्षात अडकून राहिले नाहीत. सातारकरही पक्ष न बघता राजेंना मतदान करतात. जलमंदिर पॅलेस येथे झालेल्या पत्रकार परिषदेत राजेंनी सर्व खुर्च्या एकत्र करून आपण सर्वपक्षीय असल्याचं ठणकावलं होतं.मोदी लाटेतही सामान्यांच्या मनावर अधिराज्यराज्यात आणि केंद्रात कोणाचीही लाट आली तरी त्या लाटेचा कसलाच परिणाम साताºयात झाला नाही. उदयनराजेंचा मदत करण्याचा स्वभाव, कोणताही किचकट प्रश्न दबंग स्टाईलने सोडविण्याची कला, सातारकरांची नस ओळखून त्यांच्यासोबत राहण्याची वृत्ती याबरोबरच सर्वात महत्त्वाचं म्हणजे थेट तेरावे वंशज म्हणून सातारकरांशी असलेले त्यांचे नाते त्यांना कायम सहाय्यभूत ठरले आहे. नवीन आणलेल्या गाडीचे पूजन असो वा सेल्फीचा नाद असो, तरुणाईच्या हाकेला न्याय मिळवून देणारा नेता म्हणून ते सामान्यांपर्यंत कायम पोहोचले.कायम चर्चेत राहण्याची लकब उदयनराजे यांना लाभली आहे. चर्चेत राहण्याचा योग्य ‘टायमिंग सेन्स’ उदयनराजे यांच्यामध्ये आहे. त्यामुळे कोणीही ठरवून उदयनराजे यांना बोलायला भाग पाडू शकत नाही, याचा अनुभव अनेकांना आलेला आहे. त्यांच्या मनातील प्रत्येक भाव त्यांच्या चेहºयावर झळकतो. गेल्या काही वर्षांत उदयनराजे यांच्या वादग्रस्त विधानांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस चर्चेत राहिली. त्यांच्या हटके स्टाईलही राज्यात गाजली.