शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : विखळेत कारमधून दारू वाहतूक, दोघांना अटक : सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 17:33 IST

मायणी : विखळे येथील चौकातून कारमधून विनापरवाना दारू वाहतूक करणाऱ्या वाहनावर मायणी पोलिसांनी कारवाई केली. गाडीसह सुमारे साडेसहा लाख रुपयांचा ...

ठळक मुद्देविखळेत कारमधून दारू वाहतूक, दोघांना अटक सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई

मायणी : विखळे येथील चौकातून कारमधून विनापरवाना दारू वाहतूक करणाऱ्या वाहनावर मायणी पोलिसांनी कारवाई केली. गाडीसह सुमारे साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोघांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी यांनी दिली. मायणी पोलिसांनी सलग दुसऱ्या दिवशी ही मोठी कारवाई केली आहे.याबाबत माहिती अशी की, विखळे येथील कातरखटाव-कलेढोण मार्गावरून कार (एमएच ०४ केके १०५३) मधून विनापरवाना विदेशी दारूची चोरटी वाहतूक होणार आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली मायणी पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी, पोलीस नाईक बाबूराव खांडेकर, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण सानप, योगेश सूर्यवंशी, प्रकाश कोळी यांनी विखळे चौकात सापळा रचला.मिळालेल्या माहितीप्रमाणे, गुरुवारी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास संबंधित गाडी आली. त्या गाडीची तपासणी केली असता कारमध्ये विदेशी दारूचे बॉक्स आढळून आले. त्यावेळी कारचालक व आत बसलेल्या व्यक्तीस खोक्यात काय आहे, असे विचारताच त्यांनी विदेशी दारूच्या बाटल्या आहेत, असे सांगितले. त्यावर त्यांना दारू वाहतूक व विक्रीचा परवानाबाबत विचारले, यावेळी त्यांनी परवाना नसल्याचे सांगितले.उद्धव किसन गायकवाड (वय ३७), विक्रम भीमराव गायकवाड (२५, दोघे रा. चिंचाळे ता. आटपाडी जि. सांगली) यांना अटक केली. त्यांच्याकडून सहा लाख रुपये किमतीची एक राखाडी रंगाची कार व आठ खोक्यांमध्ये ठेवलेल्या दारूच्या बाटल्या असा एकूण ६ लाख ५७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणलेपोलिसांनी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दोन दिवसांपूर्वी कारवाई करून ४ लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दुसऱ्या दिवशी लगेच ही अवैध दारू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करून ६ लाख ५७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामुळे अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याliquor banदारूबंदीSatara areaसातारा परिसर