शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : साताऱ्यात लाल परी धावली; पण प्रवाशांविना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 18:36 IST

तब्बल दोन महिन्यांपासून एकाच ठिकाणी थांबलेली एसटीची चाकं शुक्रवारी जिल्ह्यांतर्गत फेऱ्यांच्या निमित्ताने सुरू झाली. सकाळी सात वाजता काही गाड्या फलाटाला लागल्याही; पण बसस्थानकच निर्मनुष्य होते.

ठळक मुद्देसाताऱ्यात लाल परी धावली; पण प्रवाशांविना!बसस्थानक रिकामेच : तब्बल दोन महिन्यांनंतर जिल्ह्यांतर्गत फेऱ्या

सातारा : तब्बल दोन महिन्यांपासून एकाच ठिकाणी थांबलेली एसटीची चाकं शुक्रवारी जिल्ह्यांतर्गत फेऱ्यांच्या निमित्ताने सुरू झाली. सकाळी सात वाजता काही गाड्या फलाटाला लागल्याही; पण बसस्थानकच निर्मनुष्य होते.

दुपारपर्यंत अनेक मार्गांवर रिकाम्याच गाड्या धावत होत्या. पहिलाच दिवस असल्याने प्रवाशांना माहिती नव्हती. शनिवारपासून फेऱ्या सुरू होतील, अशा अपेक्षा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्यानंतर रविवार, दि. २२ मार्च रोजी जनता कर्फ्यू पाळण्यात आला. त्यामध्ये एसटीच्या सर्व फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्यानंतर तब्बल दोन महिने एसटीची प्रवासी वाहतूक बंद होती.

दरम्यानच्या काळात केंद्र शासनाने परप्रांतीयांना आपापल्या गावी जाण्याची परवानगी दिली. त्यावेळी एसटीच धावून आली. विविध राज्यांमध्ये परप्रांतीयांना घेऊन एसटी रवाना झाली; पण ही सेवा केवळ परराज्यातील प्रवाशांना अन् तेही ज्यांनी स्वत:ची वैद्यकीय तपासणी केली आहे, जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रवासाबाबत परवानगी घेतली आहे, अशांसाठी होती. सर्वसामान्य प्रवाशांना वाहतूक बंदच होती.कोरोना बाधित संदर्भातील बदलत्या निर्णयानुसार सातारा जिल्हा ह्यनॉन रेड झोनह्णमध्ये आला आहे. त्यामुळे शुक्रवारपासून जिल्हाअंतर्गत प्रवासी फेऱ्या सुरू करण्यात आल्या. एसटीने काही नियम व अटी घातल्या होत्या. यामध्ये प्रत्येक एसटीत पन्नास टक्के म्हणजे केवळ २२ प्रवासी प्रवास करू शकणार आहेत.नियोजनानुसार एसटी शुक्रवारी सकाळी सातपासून सुरू झाली. वेळापत्रकाप्रमाणे एक-एक गाड्या फलाटावर लागत होत्या. नियंत्रण कक्षात नोंद केली जात होती. प्रवासीच फिरकले नाही. वेळ झाली की गाडी आपापल्या मार्गावर मार्गस्थ होत होती. सातारा बसस्थानकात दुपारी तीनपर्यंत हेच चित्र होते.परप्रांतीय रवानाकरंजे परिसरात राहत असलेले असंख्य परप्रांतीय शुक्रवारी आपापल्या राज्यात गेले. त्यांच्यासाठी एसटीने विशेष गाडी सोडली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याstate transportएसटीSatara areaसातारा परिसर