शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : सातारा नगरपालिका क्षेत्रासह नऊ ग्रामपंचायतीमध्ये लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 23:43 IST

प्रतिबंधित क्षेत्रामध्ये सातारा तालुक्यातील खेड, विलासपूर, गोडोली, शाहूपुरी, म्हसवे, सैदापूर वाढे, कोडोली, संभाजीनगर आणि सातारा नगरपालिका  क्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे.

सातारा : सातारा आणि कराड या शहरातील कोरोना बाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे सातारा शहर, त्रिशंकू भाग आणि जवळपासच्या ९  ग्राम पंचायतीमध्ये लॉक डाऊन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी काढलेला आदेश बुधवारी मध्यरात्रीपासून लागू करण्यात आला आहे.

प्रतिबंधित क्षेत्रामध्ये सातारा तालुक्यातील खेड, विलासपूर, गोडोली, शाहूपुरी, म्हसवे, सैदापूर वाढे, कोडोली, संभाजीनगर आणि सातारा नगरपालिका  क्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे. या प्रतिबंधित क्षेत्रांमधील दवाखाने, हॉस्पिटल, नर्सिंग होम वगळून इतर सर्व प्रकारची दुकाने उद्योग इत्यादी चालू ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याबरोबरच अत्यावश्यक सेवेतील घरगुती गॅस सिलेंडर घरपोच वितरण करण्यात येणार असून त्यांना या लॉक डाऊन मधून सूट देण्यात आली आहे.

या प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये दूध आणि औषधे ही घरपोच पोहोचण्यात येतील. प्रतिबंधित क्षेत्रातील शहरातील शिवराज, कदम पेट्रोलियम आणि दोशी पेट्रोलियम हे तीनच पेट्रोल पंप अत्यावश्यक सेवेसाठी सुरू ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्याबरोबरच अत्यावश्यक सेवेमध्ये कार्यरत असणारे शासकीय, निमशासकीय, खासगी अधिकाऱ्यांनी कर्मचारी यांना यातून वगळण्यात आले आहे.

अत्यावश्यक सेवेमधील शासकीय कार्यालय सुरू राहतील त्याबरोबरच शासनमान्य शिवभोजन थाळी सुविधा देखील सुरू राहणार आहे. सातारा शहरासह जवळपासच्या ग्रामपंचायतीचे क्षेत्र प्रतिबंधित करण्यात आल्यामुळे या परिसरातील सर्व सुविधा आणि देण्यात आलेले पासही रद्द करण्यात आले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSatara areaसातारा परिसर