शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : नीरा पूल बंदमुळे तीन तालुक्यांचे जनजीवन विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 17:55 IST

फलटण, बारामती आणि इंदापूर तालुक्यांच्या सीमा फलटण तालुक्याच्या पूर्व भागातून वाहणाऱ्या नीरा नदीवर आहे. आसू आणि गोखळी येथील या नदीवर असणारे पूल या तीन तालुक्यांचा संबंध जोडणारा दुवा ठरत आहे; पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने तीन तालुक्यांचे संबंध खंडित होऊन येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊनमुळे पुलावरील वाहतूक थांबवली जिल्हा बंदीचे आदेश शिथिल करण्याची मागणी

फलटण : फलटण, बारामती आणि इंदापूर तालुक्यांच्या सीमा फलटण तालुक्याच्या पूर्व भागातून वाहणाऱ्या नीरा नदीवर आहे. आसू आणि गोखळी येथील या नदीवर असणारे पूल या तीन तालुक्यांचा संबंध जोडणारा दुवा ठरत आहे; पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने तीन तालुक्यांचे संबंध खंडित होऊन येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे पुलावरील वाहतूक बंद करण्यात आले. या तीन तालुक्यांतील बाजारपेठ, आरोग्य सुविधा, दैनंदिन व्यवहार, शेती या बाबी एकमेकांवर अवलंबून असल्याने या ठिकाणी जिल्हाबंदीचे आदेश शिथिल करण्याची मागणी फलटण तालुक्याच्या पूर्व भागातून होत आहे.भोर, खंडाळा, फलटण, बारामती, इंदापूर तालुक्यातून वाहणारी नीरा या तालुक्यातील लोकांची जीवन वाहिनी आहे. लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी वरदान ठरली आहे. पाडेगाव, साखरवाडी, होळ, जिंती, फडतरवाडी, सोमंथळी, राजाळे, सरडे, साठे, गोखळी, ढवळेवाडी, आसू या गावांतील नदीकाठचा भाग सुजलाम् सुफलाम् करण्यास उपयुक्त ठरली आहे.

नदीवर अनेक ठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे असल्याने उन्हाळ्यातही पाणीसाठा उपलब्ध असल्याने परिसरातील लोकांना पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी पाणी टंचाई भासत नाही. त्याप्रमाणे बारामती व इंदापूर तालुक्याला ती अधिक फायदेशीर ठरली आहे. अशा स्थितीत या तिन्ही तालुक्यांतील नागरिकांची महसुली मालमत्ता या भागात विखुरलेली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाबंदी आदेश असल्याने आसू ग्रामपंचायतीने आसू-तावशी बंधारा व गोखळी ग्रामपंचायतीने गोखळी पुलावरून वाहतूक प्रशासनाच्या आदेशानुसार बंद केली असल्याने ग्रामस्थांची कुचंबणा होत आहे.शिवरुपराजे खर्डेकर प्रांताधिकाऱ्यांशी बोलणारबारामती शहर व फलटण तालुक्याचा पूर्व भाग कोरोनामुक्त आहे. गोखळी पूल व आसू-तावशी बंधारा येथे कडक तपासणी नाके निर्माण करून गरजू लोकांना अलीकडे, पलीकडे जाण्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्यावी, यासाठी आपण प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांच्या बैठकीत हा प्रश्न उपस्थित करून जाण्या-येण्यास परवानगी मिळेल, यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही शिवरुपराजे खर्डेकर यांनी दिली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याriverनदीpwdसार्वजनिक बांधकाम विभागSatara areaसातारा परिसर