शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

CoronaVirus Lockdown : खरशिंगेत १४ दिवस होणार दररोज जंतुनाशक फवारणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 17:41 IST

खटाव तालुक्यातील खरशिंगे येथे कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने प्रशासनाकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. आरोग्य विभागाच्यावतीने गावातील कुटुंबांचे सर्वेक्षण सुरू आहे. तसेच लोकांना घरपोच किराणा देण्यात येत आहे. नागरिकांनी दक्षता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

ठळक मुद्देघरपोच किराणासह कुटुंबांचे सर्वेक्षण सुरू काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन, गावकऱ्यांचे थर्मल स्क्रिनिंग सुरू

औंध : खटाव तालुक्यातील खरशिंगे येथे कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने प्रशासनाकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. आरोग्य विभागाच्यावतीने गावातील कुटुंबांचे सर्वेक्षण सुरू आहे. तसेच लोकांना घरपोच किराणा देण्यात येत आहे. नागरिकांनी दक्षता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.कोरोनापासून दूर असलेल्या खटाव तालुक्यात सोमवारी कोरोनाचा शिरकाव झाला. तालुक्याची झोपच उडाली असून, प्रशासनाची पळापळ सुरू झाली आहे. तसेच आसपासची गावे भयभीत झाली आहेत. प्रशासन तळ ठोकून खरशिंगे गावात आहे. तर गावात येणाऱ्या सर्व सीमा सील करण्यात आल्या आहेत.

३५० कुटुंबसंख्या व १२०० लोकसंख्या असलेल्या खरशिंगेत आरोग्य विभागाच्यावतीने आठ पथके गावात तैनात करण्यात आली आहेत. सर्वांचे थर्मल स्क्रिनिंग करण्यात येत आहे.

तसेच स्वयंसेवकांकडून घरपोच अत्यावश्यक किराणा ही पोहोचवणे सुरू आहे. गावकऱ्यांनी वेळोवेळी आपल्या घरातील सदस्यांनी काळजी घ्यावी, कोणाला कसलाही शारीरिक त्रास जाणवल्यास तत्काळ कळविण्याचे सांगण्यात आले आहे.

तालुक्यातील लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. घाबरून न जाता काळजी घ्यावी, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, प्रशासन योग्य प्रकारे खबरदारी घेत आहे. चुकीच्या बातम्या कोणीही पसरवू नये.- डॉ. अर्चना पाटील, तहसीलदार, खटाव.

लोकांनी घाबरून जाऊ नये, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, घराबाहेर पडू नये, वारंवार हात साबणाने धुवावेत. काही त्रास जाणवल्यास ग्रामस्थांनी आरोग्य विभागाशी संपर्क साधावा. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे.-डॉ. युनूस शेख, तालुका वैद्यकीय अधिकारी.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर