शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown :जिल्ह्यात ११ आमदार, ३ खासदार, राजकीय इच्छाशक्ती वाढविण्याची आवश्यकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 17:34 IST

जिल्ह्यातील मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर झालेल्या बदलानुसार अनेकांचे मतदारसंघ उडाले. काही नव्याने तयार झाल्याने त्याठिकाणी ताकद लावाली लागली. जिल्ह्यात दहाचे आठ आमदार झाले आणि दोनाचे एक खासदार झाले. पण जिल्ह्याचे राजकीय नशीब पालटले आणि आठचे अकरा आमदार आणि एकाचे तीन खासदार झाले.

ठळक मुद्देजिल्ह्यात ११ आमदार, ३ खासदार, राजकीय इच्छाशक्ती वाढविण्याची आवश्यकताजिल्ह्याची राजकीय ताकद वाढल्याने विकासाला जोर

दीपक शिंदेसातारा : जिल्ह्यातील मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर झालेल्या बदलानुसार अनेकांचे मतदारसंघ उडाले. काही नव्याने तयार झाल्याने त्याठिकाणी ताकद लावाली लागली. जिल्ह्यात दहाचे आठ आमदार झाले आणि दोनाचे एक खासदार झाले. पण जिल्ह्याचे राजकीय नशीब पालटले आणि आठचे अकरा आमदार आणि एकाचे तीन खासदार झाले.

राज्यसभेसाठी खासदार उदयनराजे भोसले आणि विधान परिषदेसाठी आमदार शशिकांत शिंदे यांच्या माध्यमातून १ खासदार आणि १ आमदार अधिक मिळाला. रामराजे नाईक निंबाळकर आणि महादेव जानकर यांच्यामुळे अकरा आमदार आणि तीन खासदार अशी राजकीय ताकद वाढलेलीय. या नेत्यांच्या राजकीय ताकदीचा जिल्ह्याच्या विकासासाठी नक्कीच फायदा होईल.

सातारा जिल्ह्यात मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर अनेक बदल झाले. एका मतदारसंघात दोन मतदारसंघ विलीन झाले आणि अनेक वर्षे मतदारसंघ राखून ठेवलेल्या नेत्याचे कसब पणाला लागले. या पुनर्रचनेनुसार जिल्ह्यात आमदारकीसाठी आठ मतदारसंघ आणि खासदारकीचा एक मतदारसंघ झाला.

सातारा-जावळी, वाई-महाबळेश्वर - खंडाळा, माण-खटाव, फलटण, कऱ्हाड दक्षिण, कऱ्हाड उत्तर, पाटण आणि कोरेगाव असे आठ मतदारसंघ तयार झाले. तर सातारा आणि कऱ्हाड मिळून खासदारकीचा एकच मतदारसंघ तयार झाला. त्यामुळे अनेकांची राजकीय कोंडी झाली. आपल्या विभागात प्रभाव असला तरी दुसऱ्या उमेदवाराच्या मतदारसंघात जाऊन ताकद लावावी लागली.

मतदारसंघाच्या पुनर्रचनेतच शशिकांत शिंदे यांचे घोडे जावळीत अडले. माथाडी कामगारांचे प्रतिनिधीत्व करणारे शशिकांत शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने जावळीतून उमेदवारी दिली आणि सलग दोनवेळा तेथून ते निवडूनही आले. हा मतदारसंघ सातारा आणि जावळी या भागात विभागला गेला आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासाठी शशिकांत शिंदे यांना हा मतदारसंघ सोडावा लागला. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसने शशिकांत शिंदे यांची कोरेगावमध्ये व्यवस्था केली.

साताऱ्यातून शिवेंद्रसिंहराजेंनी शशिकांत शिंदेंना मदत करायची आणि जावळीत शशिकांत शिंदेंनी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मदत करायची, असा अलिखित समझोता झाला. गत निवडणुकीत सर्वच राजकीय गणिते फिरली. शिवेंद्रसिंहराजे भाजपमध्ये गेले आणि शशिकांत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच थांबले. त्यांनाही भाजपचे आवतन होतेच, दबावही होता. पण, शरद पवार यांच्यावरील निष्ठा आणि प्रेमापोटी त्यांनी राष्ट्रवादी सोडली नाही.

खासदार उदयनराजे भोसले हे देखील राष्ट्रवादीकडून निवडणूक रिंगणात असताना शशिकांत शिंदे यांनी सर्व आमदारांचा रोष ओढावून त्यांना मदत केली. पण, शशिकांत शिंदे यांच्या विधानसभा निवडणुकीला खासदार उदयनराजेंची मदत युतीचे उमेदवार महेश शिंदे यांना झाली. इथेच अडचण झाली आणि सहा हजार मतांनी शशिकांत शिंदेंचा पराभव झाला.

राष्ट्रवादी काँग्रेसची साताऱ्यातील प्रचाराची सुरुवात असो अगर शेवटची पावसातील सभा. यामध्ये शशिकांत शिंदे यांचे संघटन कौशल्य पाहायला मिळाले. राज्यात आणि जिल्ह्यातही राष्ट्रवादीला यश मिळाले; पण शशिकांत शिंदे यांचा पराभव झाल्याने शरद पवार यांनी साताऱ्यात विजयी सभा घेण्याचा निर्णय बदलला. एवढा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला.

राष्ट्रवादीच्या या निष्ठेचे फळ त्यांना मिळणारच होते. ते विधान परिषदेच्या सदस्याच्या रुपाने मिळाले. पुढे मंत्रिपदही मिळेल. कारण, पक्ष वाढीसाठी धडपडणाऱ्या कार्यकर्त्यांना जपण्याची शरद पवार यांची पद्धत आहे. विधान परिषदेचे अध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर आणि महादेव जानकर यांच्या माध्यमातून आणखी दोन आमदार वाढल्याने जिल्ह्यातील आमदारांचे संख्या अकरा झाली आहे. त्यामुळे पुनर्रचनेनंतरही जिल्ह्याची राजकीय ताकद वाढली आहे.

आत्तापर्यंत राजकीय ताकदीमध्ये सांगली जिल्हा अव्वल ठरत होता. या जिल्ह्यामध्ये तीन-तीन मंत्रिपदे दिली जात होती. त्याबरोबरच आता सातारा जिल्ह्याचेही राजकीय वजन वाढत आहे. सध्या जिल्ह्याच्या वाट्याला सहकारमंत्री आणि गृहराज्यमंत्री असे एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रिपद आहे.

शशिकांत शिंदेंच्या माध्यमातून आणखी एक मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. तसेच खासदार उदयनराजे भोसले यांनीही जरा जोर लावला तर त्यांनाही केंद्रातील मंत्रिपद मिळू शकते. असे झाले तर नक्कीच जिल्ह्याची राजकीय ताकद वाढून त्याची जिल्ह्याच्या विकासाला मदत होणार आहे.उदयराजेंचा तह...रणजितसिंहांची लॉटरी...राष्ट्रवादीने राखली जागाखासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये जाताना भाजपशीही अलिखित तहच केला होता. दगा फटका होऊन जर खासदारकीच्या निवडणुकीत पराभव झाला तर राज्यसभेवर खासदार म्हणून घेतले जावे, असे ठरले होते. भाजपने हा शब्द पाळला आणि उदयनराजे भोसले यांना राज्यसभेची खासदारकी मिळाली. माढा मतदारसंघातही राजकीय उलथापालथ झाली आणि शरद पवार यांना स्वत:ला हा मतदारसंघ सोडावा लागला. भाजपने त्याठिकाणी रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी दिली आणि या मतदारसंघातून ते निवडून आले.

जिल्ह्याला त्यांच्या रुपाने आणखी एक खासदार मिळाला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने सातारा मतदारसंघ राखण्यात यश मिळविल्याने खासदार श्रीनिवास पाटील, माढ्याच्या रुपाने खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि राज्यसभेच्या माध्यमातून खासदार उदयनराजे भोसले असे तीन खासदार जिल्ह्याला मिळाले. 

टॅग्स :PoliticsराजकारणSatara areaसातारा परिसर