गोखळीत एकीच्या जोरावर कोरोनामुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:50 IST2021-06-16T04:50:23+5:302021-06-16T04:50:23+5:30
फलटण : गोखळीसह आणि पंचक्रोशीतील कोरोना रुग्णांची वाढती लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी गोखळी ग्रामस्थांनी एकत्र येत उपाययोजना केल्या. यामुळे गोखळी ...

गोखळीत एकीच्या जोरावर कोरोनामुक्ती
फलटण : गोखळीसह आणि पंचक्रोशीतील कोरोना रुग्णांची वाढती लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी गोखळी ग्रामस्थांनी एकत्र येत उपाययोजना केल्या. यामुळे गोखळी गाव कोरोनामुक्त झाले आहे.
फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील गोखळी येथे कोरोना रुग्णसंख्या प्रचंड वाढली होती. वाढत्या संसर्गाला आटोक्यात आणण्यासाठी गोखळी ग्रामपंचायत आणि तरुणांनी एकत्र येऊन लोकसहभागातून कोरोना विलीनीकरण कक्ष १३ मेपासून सुरू केला होता.
गावातील विलीनीकरण कक्षामध्ये एका महिन्यात डॉक्टरच्या सल्ल्यानुसार ७४ रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यांना प्रत्येकी एक झाड देऊन सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला.
विलिनीकरण कक्षातील रुग्णसंख्या ७ जूनपासून गोखळी येथे कोरोनाबाधितांची संख्या शून्यावर रोखण्यात यश मिळवले.
याकरिता योगदान देत असलेल्या कोरोना योद्ध्याचा, दररोज मोफत सेवा देणाऱ्या गावातील डॉ. शिवाजीराव गावडे, डॉ. अमोल आटोळे, डॉ. नितीन गावडे, डॉ. विकास खटके, डॉ. सानिया शेख, आशा वर्कर्स दुर्गा आडके, अंगणवाडीसेविका सुरेखा आटोळे यांचा कोरोना आपत्ती समितीच्या वतीने अध्यक्ष सरपंच सुमनताई गावडे यांचे हस्ते झाडं देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी उद्धवराव गावडे उपस्थित होते.
या वेळी डॉ. गावडे म्हणाले, ‘आपल्या गावातील कोरोना रुग्णसंख्या कमी झाली असली तरी यापुढेही दुसऱ्या साथीच्या पार्श्वभूमीवर अद्याप लसीकरणासाठी लस उपलब्ध झाली नाही. सर्व लाभार्थी यादी तयार करून त्यांना लस उपलब्ध करून देण्यात आली पाहिजे. ज्याची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, त्यांनी सरकारी लसीकरणासाठी वेळ न घालवता पैसे खर्च करून लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. परंतु ज्यांची लस विकत घेण्यासाठी आर्थिक परिस्थिती नाही त्यांच्यासाठी गावपातळीवर नियोजन करण्याची गरज आहे.’
राधेश्याम जाधव यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र भागवत यांनी आभार मानले.