मलकापुरात कोरोनामुक्ती दर ९३.४ टक्क्यांवर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:44 IST2021-08-14T04:44:34+5:302021-08-14T04:44:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मलकापूर : मलकापुरात आत्तापर्यंत एकूण २ हजार ९५२ बाधित आढळले. त्यापैकी २ हजार ७५७ जणांनी कोरोनावर ...

मलकापुरात कोरोनामुक्ती दर ९३.४ टक्क्यांवर!
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : मलकापुरात आत्तापर्यंत एकूण २ हजार ९५२ बाधित आढळले. त्यापैकी २ हजार ७५७ जणांनी कोरोनावर मात केली तर ८० जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहराचा मुक्ती दर कमी होऊन ९३.४ टक्क्यांवर गेला आहे. मृत्यूदर २.७ टक्क्यांवर स्थिर आहे. तर ॲक्टिव्ह रुग्णसंख्या दर गेल्या महिन्याच्या तुलनेत कमी होऊन ३.९ टक्क्यांवर आहे. मात्र, नियमांचे उल्लंघन व गृह अलगीकरणामुळे मलकापूर शहर कोरोनामुक्त होण्यास अडथळे येत असल्याचे दिसत आहे.
मलकापुरात पहिल्या टप्प्यात एका महिन्यात शहरात ३१ रुग्ण होते. पालिका, शासन व आरोग्य विभागाने कोरोना लढ्याचे योग्य नियोजन व उपचाराने एक महिन्यातच शहराला कोरोनामुक्त केले होते. मात्र, एक महिन्याच्या विश्रांतीनंतर पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला होता आणि शहरात टप्प्याटप्प्याने रुग्ण वाढतच गेले. ऑगस्ट व सप्टेंबर या दोन महिन्यांत तर कोरोनाने कहर केला होता. ऑक्टोबर महिन्यापासून बाधितांची संख्या कमी कमी होत गेली. नोव्हेंबर महिन्यात दिवसाला सरासरी दोन-तीनजण तर डिसेंबर महिन्यात केवळ १८ जणच बाधित सापडले होते. शहरात हळूहळू संख्या कमी झाली असली तरी बाधित होण्याचे थांबलेले नव्हते. मात्र, जानेवारी २०२१पासून पुन्हा वाढ होत गेली. जानेवारी, फेब्रुवारी व मार्च या तीन महिन्यांत १११ रुग्ण वाढले तर एप्रिल महिन्यात तब्बल ४५३ बाधित सापडले. त्यापुढे मे महिन्यातही कोरोनाचा कहर सुरूच राहिला. ११ जूनअखेर ३५ दिवसांत तब्बल ५९२ जण बाधित सापडले होते. १० जुलैअखेर मे आणि जून महिन्यांच्या तुलनेत थोडासा दिलासा मिळाला असला, तरी ३३० जण पॉझिटिव्ह सापडले तर १० ऑगस्टपर्यंत चालू महिन्यातही ३७५ बाधित रुग्ण सापडले आहेत.
चौकट
१५ महिन्यांचा लेखाजोखा
२२ एप्रिल ते २४ मे ३१, २५ मे ते २५ जून ०, २६ जून ते २६ जुलै ४३, २७ जुलै ते २६ ऑगस्ट ३३८, २७ ऑगस्ट ते २६ सप्टेंबर ४२८, २७ सप्टेंबर ते २७ ऑक्टोबर १५९, २८ ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबर ६९, २८ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर १८, ३१ डिसेंबर ते ३० जानेवारी १५, ३१ जानेवारी ते २८ फेब्रुवारी १९, १ मार्च ते २ एप्रिल ७७, ३ एप्रिल ते ६ मे ४५३, ७ मे ते ११ जून ५९२, ११ जून ते १० जुलै ३३०, ११ जुलै ते १२ ऑगस्ट ३७५.
चौकट
ॲक्टिव्ह रुग्ण शंभरीपार
एकूण- २९५२, मृत्यू - ८०, डिस्चार्ज - २७५७, उपचारार्थ - ११५, त्यापैकी रुग्णालयात - २९, गृह अलगीकरणात - ८४, संस्थात्मक विलगीकरणात २.