गावोगावच्या यात्रांवर कोरोनाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:37 IST2021-03-25T04:37:21+5:302021-03-25T04:37:21+5:30

.................. माणमधील बंधाऱ्यात पाणीसाठा टिकून वरकुटे मलवडी : माण तालुक्यात गेल्यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे सद्य:स्थितीत गावोगावच्या बंधाऱ्यांत सध्याही काही ...

Corona's sabotage on village trips | गावोगावच्या यात्रांवर कोरोनाचे सावट

गावोगावच्या यात्रांवर कोरोनाचे सावट

..................

माणमधील बंधाऱ्यात

पाणीसाठा टिकून

वरकुटे मलवडी : माण तालुक्यात गेल्यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे सद्य:स्थितीत गावोगावच्या बंधाऱ्यांत सध्याही काही प्रमाणात पाणीसाठा टिकून आहे. त्यामुळे उन्हाळी पिकांना पाण्याची उपलब्धता होत आहे. गेल्यावर्षी दमदार पाऊस झाला होता. यामुळे गावोगावचे ओढे भरून वाहिले होते. तसेच बंधारे भरले होते. त्यामुळे अजूनही काही बंधाऱ्यांत काही प्रमाणात पाणीसाठा टिकून आहे. शेतीसाठी याचा फायदा होत आहे.

......................................

आठवडीबाजारांमुळे कोरोनाचा धोका

सातारा : जिल्ह्यातील आठवडीबाजार सुरू असले तरी लोकांकडून सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढू लागला आहे. बाजाराच्या ठिकाणी अनेक गावचे ग्रामस्थ येतात. तसेच गर्दीतच खरेदी करण्यात येते. काही नागरिक तर तोंडाला मास्कही लावत नाहीत. यामुळे कोरोनाचा धोका निर्माण झाला आहे. शासन नियमांचे पालन करण्याची गरज आहे.

..........................................

डोंगरपायथा रस्ता डांबरीकरणाची मागणी

वरकुटे मलवडी : माण तालुक्यातील बनगरवाडी ते श्री भोजलिंग डोंगरपायथा रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे. सुमारे चार किलोमीटरचा हा रस्ता आहे. या रस्त्यावर जागोजागी चरी खोदलेल्या आहेत. तसेच खड्डेही पडलेले आहेत. यामुळे वाहनधारकांना कसरत करत जावे लागत आहे.

...........................................

घंटागाड्यांना उशीर

सातारा : सातारा शहरातील काही भागांत घंटागाड्या उशिरा येत आहेत. यामुळे नागरिकांना कचरा टाकण्यासाठी वाट पाहावी लागत आहे. शहरातील मंगळवार पेठ भागातच अशी परिस्थिती अधिक आहे. तसेच यामुळे काही नागरिक रस्त्याच्या बाजूलाच कचरा टाकत असतात. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते.

.........................................

Web Title: Corona's sabotage on village trips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.