शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

माण तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रावर कोरोनाची टांगती तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 16:38 IST

Coronavirusunlock, School, Education Sector, Satara area लॉकडाऊननंतर २३ नोव्हेंबर रोजी नववी, दहावीच्या शाळा सुरू झालेल्या असल्या तरी दिवसेंदिवस शाळांचा पट रोडावत चालला आहे. देवापूर येथील शाळेत विद्यार्थिनी कोरोनाबाधित सापडल्याने शाळा बंद करण्यात आली आहे. नऊ गावांत कोरोनाचे रुग्ण सापडल्याने तेथील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. तर दोन उमदे प्राथमिक शिक्षक कोरोनाचे बळी ठरल्याने शैक्षणिक क्षेत्रावर भीतीचे सावट आहे.

ठळक मुद्देमाण तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रावर कोरोनाची टांगती तलवारनऊ गावांत रुग्ण आढळल्याने शाळा बंद

वरकुटे-मलवडी : लॉकडाऊननंतर २३ नोव्हेंबर रोजी नववी, दहावीच्या शाळा सुरू झालेल्या असल्या तरी दिवसेंदिवस शाळांचा पट रोडावत चालला आहे. देवापूर येथील शाळेत विद्यार्थिनी कोरोनाबाधित सापडल्याने शाळा बंद करण्यात आली आहे. नऊ गावांत कोरोनाचे रुग्ण सापडल्याने तेथील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. तर दोन उमदे प्राथमिक शिक्षक कोरोनाचे बळी ठरल्याने शैक्षणिक क्षेत्रावर भीतीचे सावट आहे.मागील काही दिवसांत गौरी-गणपती, दसरा-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर माण तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. उपस्थित विद्यार्थ्यांची संख्या अत्यल्प होती. त्यातच कोरोनाच्या भीतीने दिवसेंदिवस विद्यार्थ्यांच्या संख्येत घटच होऊ लागली आहे.

कोरोनाची काळजी घेताना शाळांमध्ये सोयी-सुविधांचा अभाव तसेच शिक्षक व विद्यार्थ्यांचा हलगर्जीपणा दिसून येत आहे. यामुळे शासनाने घालून दिलेल्या नियमावलींंचे काटेकोर पालन होत नाही. शाळेत येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी स्वतःची कोरोना चाचणी करून तसे प्रमाणपत्र शाळा प्रशासनाला सादर केले आहे. मात्र, यापुढे कोणीच कोरोनाबाधित होणार नाही, याची खात्री देणार कोण? हा गहन प्रश्न आहे.

शाळेत येणारे शिक्षक व विद्यार्थी नानाविध ठिकाणांहून येतात, त्यामुळे चिंतेत भर पडत आहे. पालकांनी संमतीपत्र देऊनही अनेक विद्यार्थी अनुपस्थित राहत आहेत. ऑनलाईन जेवढे विद्यार्थी हजर राहत होते, त्याच्या निम्मेसुद्धा विद्यार्थी शाळा सुरू झाल्यापासून उपस्थित राहत नाहीत, अशी परिस्थिती आहे.माण तालुक्यातील एकूण ७२ पैकी ६७ शाळा २३ नोव्हेंबर रोजी सुरू झाल्या होत्या. त्यामध्ये एकूण ११ हजार ४६७ विद्यार्थ्यांपैकी २ हजार २४० विद्यार्थी पहिल्या दिवशी उपस्थित होते. त्यानंतर काही गावांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यामुळे चार शाळा बंद करण्यात आल्या.

विद्यार्थी संख्या दिवसेंदिवस घटून ती १ हजार ८६९ पर्यंत खाली आली. देवापूर शाळेत विद्यार्थिनीच कोरोनाबाधित सापडल्याने शाळा बंद करण्यात आली तर जांभुळणी, वरकुटे-मलवडी, पालवण, वडजल, राणंद, म्हसवड शहरातील मेरीमाता स्कूल, पिंगळी बुद्रुक, गोंदवले खुर्द व धुळदेव येथील शाळा गावांत कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यामुळे ग्रामस्थांनीच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकSchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्रSatara areaसातारा परिसर