कोरोनाची पहिली लाट ज्येष्ठांच्या; तर दुसरी तरुणांच्या जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:28 IST2021-06-06T04:28:26+5:302021-06-06T04:28:26+5:30

सातारा: जिल्ह्यात गतवर्षी कोरोनाच्या पहिला लाटेमध्ये ज्येष्ठांचा बळी गेला तर दुसरी लाट तरुणांच्या जीवावर उठली आहे. या लाटेमध्ये १७३८ ...

Corona's first wave of seniors; The other is on the lives of young people | कोरोनाची पहिली लाट ज्येष्ठांच्या; तर दुसरी तरुणांच्या जीवावर

कोरोनाची पहिली लाट ज्येष्ठांच्या; तर दुसरी तरुणांच्या जीवावर

सातारा: जिल्ह्यात गतवर्षी कोरोनाच्या पहिला लाटेमध्ये ज्येष्ठांचा बळी गेला तर दुसरी लाट तरुणांच्या जीवावर उठली आहे. या लाटेमध्ये १७३८ हून अधिक जणांचा जीव गेला आहे. पहिल्या लाटे वेळी केवळ वयस्कर लोकांचे बळी जात होते त्यामुळे तरुण वर्ग गाफिल होता. दुसरी लाट एखाद्या चक्रीवादळाप्रमाणे आली. या लाटेमध्ये सरसकट तरुणांनाही खेचून घेतले. याचे मुख्य कारण काही तरुणांची बेफिकिरी असल्याचे वैदिक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर कोरोना लसीकरण न झालेल्या तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे बळींची प्रमाणही तरुणांमध्ये अधिक असल्याचे दिसून येत आहे. ही दुसरी लाट तरुणांसाठी जीवघेणी असल्यामुळे जितक्या लवकर तरुणांचे लसीकरण होईल तितके महत्त्वाचे आहे. तरच ही तरुणांची फळी या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून सुरक्षित राहील.

कोट: सोशल डिस्टंसिंग, तोंडाला मास्क आणि घराबाहेर न पडणे, या त्रिसूत्रीचा वापर तरुणांनी करणे गरजेचे आहे. अनेकांनी हे नियम पाळले नाहीत. त्यातच लसीकरण झाले नाही. त्यामुळे दुसऱ्या लाटेमध्ये तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे. ही बळींची संख्या रोखण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत.

डॉक्टर सुभाष चव्हाण जिल्हा शल्यचिकित्सक सातारा

Web Title: Corona's first wave of seniors; The other is on the lives of young people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.