वेळे येथे कोरोना योद्ध्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:19 IST2021-02-05T09:19:36+5:302021-02-05T09:19:36+5:30
वेळे : कोरोनाने संपूर्ण जगात हाहाकार माजवला असताना त्याला रोखण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. त्यामुळेच रुग्णसंख्या कमी झाली. अशा कोरोना ...

वेळे येथे कोरोना योद्ध्यांचा सत्कार
वेळे : कोरोनाने संपूर्ण जगात हाहाकार माजवला असताना त्याला रोखण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. त्यामुळेच रुग्णसंख्या कमी झाली. अशा कोरोना योद्ध्यांचा सत्कार वेळे येथे ‘आरपीआय’ डेमोक्रॅटिक पक्षाचे ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष व वेळेचे सुपुत्र विधात सोनावणे यांनी केला.
भुईंज पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक कांबळे, भंडारी, किर्दत तसेच डॉक्टर, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, परिचारिका, सफाई कर्मचारी, पत्रकार, समाजसेवकांचा सत्कार करून त्यांना मानचिन्ह देण्यात आले.
कोरोनाला रोखण्यासाठी शासकीय पातळीवरून प्रयत्न झाले. त्याचप्रमाणे गावातील होतकरू तरुण व समाजसेवकांनीही प्रसंगी आपले प्राण संकटात टाकून झुंज दिली. संकटांवर मात करत हा लढा यशस्वी केला. त्यांच्या या कार्याची दखल घेणे गरजेचे होते, म्हणूनच हा सन्मान करण्यात आला, असे विधात सोनावणे यांनी सांगितले.
फोटो ओळ : वेळे (ता. वाई) येथे विधात सोनावणे यांच्या हस्ते कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. (छाया : अभिनव पवार)
\\\\\\\\\\\\\\\\\