corona virus -साताऱ्यात कोरोना बाधितांची संख्या दोनवर, एक महिला बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 11:48 AM2020-03-24T11:48:38+5:302020-03-24T11:51:09+5:30

सातारा जिल्ह्यातील ४५ वर्षीय एक महिला कोरोना बाधित झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता कलिफोर्नियातून आलेल्या एका पुरुषाचाही रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णाची संख्या दोनवर पोहोचली आहे.

corona virus - Two times the number of corona infections in a week, one is infected | corona virus -साताऱ्यात कोरोना बाधितांची संख्या दोनवर, एक महिला बाधित

corona virus -साताऱ्यात कोरोना बाधितांची संख्या दोनवर, एक महिला बाधित

Next
ठळक मुद्देसाताऱ्यात कोरोना बाधितांची संख्या दोनवर, एक महिला बाधित आता कॅलिफोर्नियातून आलेल्या पुरुषाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह

सातारा : सातारा जिल्ह्यातील ४५ वर्षीय एक महिला कोरोना बाधित झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता कलिफोर्नियातून आलेल्या एका पुरुषाचाही रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णाची संख्या दोनवर पोहोचली आहे.

जगभरात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. चीन, इटली, अमेरिका अशा देशात तर कोरोनाने मृत्यू झालेल्यांचा आकडा मोठा आहे. आता भारतातही कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढू लागलीय. सातारा जिल्ह्यातही सोमवारी प्रथमच एक महिला कोरोना बाधित आढळून आली.

संबंधित ४५ वर्षीय महिला रविवारी सायंकाळी जिल्ह्यात आली होती. त्यानंतर त्या महिलेला रात्रीच्या सुमारास अचानक खोकला येऊ लागला. त्यामुळे कुटुंबीयांनी तत्काळ साताऱ्यातील दिवंगत क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल केले.

त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी महिलेच्या घशातील स्त्रावाचे नमुने पुणे येथील एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविले होते. याचा अहवाल सोमवारी रात्री जिल्हा रुग्णालयाला प्राप्त झाला. त्यामध्ये संबंधित महिला कोविड - १९ बाधित असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. असे असतानाच सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास आणखी एक पुरुष कोरोना बाधित झाल्याचे अहवालावरुन स्पष्ट झाले.

जिल्ह्यात कॅलिफोर्निया येथून आलेल्या एका ६३ वर्षीय पुरुषाला ताप व घसा दुखी असल्यामुळे शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षात तातडीने दाखल करण्यात आले होते. या संशयित रुग्णाचा रिपोर्ट मिळाला असून तो कोविड - १९ बाधित आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दोन झाली आहे

Web Title: corona virus - Two times the number of corona infections in a week, one is infected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.