कऱ्हाड : शहरासह तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली असून, सामान्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. मंगळवारी रात्री कऱ्हाड शहरासह तालुक्यातील एकूण १४५ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.कऱ्हाड शहरातील वाखाण रोड येथील २, मंगळवार पेठ ३, शनिवार पेठ ६, कार्वे नाका ३, बुधवार पेठ २, सोमवार पेठ १ आणि इतर १५ असे ३२ जणांचे अहवाल मंगळवारी रात्री बाधित आले आहेत. तर तालुक्याच्या ग्रामीण भागातील मलकापूर येथील १२, जिंती ६, तुळसण १, टेंभू ५, येळगाव १, तांबवे ५, कोपर्डे १, मसूर ७, आटके ६, विंग ४, आगाशिवनगर ३, कोयना वसाहत ४, येरवळे १, काले ४, पाडळी १३, सैदापूर १, खराडे १, साकुर्डी १, मुंढे १, हेळगाव २, उंब्रज १, ओंडोशी १, साजूर १, साळशिरंबे २, हजारमाची २, चोरे १, शेणोली १, येवती १, बाबरमाची १, कापिल २, किरपे १, हावळेवाडी १, विद्यानगर ५, सवादे २, पार्ले १, रेठरे बुद्रुक २, वारुंजी १, रेठरे खुर्द १, नांदगाव १, गोटे ३, तासवडे १, जुळेवाडी १ आणि आटकेतील १ असे ११३ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.दरम्यान, मंगळवारी दिवसभरात तालुक्यातील चार रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पाल येथील ७७ वर्षीय पुरुष, रेठरे येथील ७५ वर्षीय महिला, उंब्रज येथील ५० वर्षीय पुरुष, किवळ येथील ८२ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.पाटण तालुक्यात ३० बाधित; ४ मृत्यूरामापूर : पाटण तालुक्यातील ३० जणांचा कोरोना अहवाल मंगळवारी रात्री बाधित आला आहे. त्यामध्ये तळमावले, मालदन, गुढे, सणबूर, पाचुपतेवाडी, अंबवणे, बहुले, जमदाडवाडी, मोरगिरी, वाडीकोतावडे येथील प्रत्येकी १, मोळावडेवाडी, मारुल हवेली येथील प्रत्येकी २ तर पाटण येथील ५, कातवडीतील ४, दिवशी बुद्रुकमधील ७ जणांचा समावेश आहे. तर मंगळवारी पाटण तालुक्यातील आणखी चार रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
corona virus : कऱ्हाड तालुक्यात आणखी १४५ रुग्णांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 15:30 IST
कऱ्हाड शहरासह तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली असून, सामान्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. मंगळवारी रात्री कऱ्हाड शहरासह तालुक्यातील एकूण १४५ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
corona virus : कऱ्हाड तालुक्यात आणखी १४५ रुग्णांची भर
ठळक मुद्देकऱ्हाड तालुक्यात आणखी १४५ रुग्णांची भरदिवसभरात चार रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू