सव्वाशे व्यापा-यांचे कोरोना अहवाल निगेटीव्ह, कोळेवाडीत तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2020 01:17 PM2020-11-12T13:17:47+5:302020-11-12T13:20:50+5:30

coronavirus, karad, health, diwali, satara कोळे, ता. क-हाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने दिपावलीच्या पार्श्वभूमीवर कोरोना प्रतिबंधक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून परिसरातील व्यावसायीकांची कोरोना तपासणी करण्यात येत असून आजअखेर सव्वाशे व्यापा-यांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.

Corona report of 500 traders negative, investigation in Kolewadi | सव्वाशे व्यापा-यांचे कोरोना अहवाल निगेटीव्ह, कोळेवाडीत तपासणी

सव्वाशे व्यापा-यांचे कोरोना अहवाल निगेटीव्ह, कोळेवाडीत तपासणी

Next
ठळक मुद्देसव्वाशे व्यापा-यांचे कोरोना अहवाल निगेटीव्ह, कोळेवाडीत तपासणीदिपावलीच्या पार्श्वभुमिवर आरोग्य विभाग सतर्क

कुसूर : कोळे, ता. कऱ्हाड  येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने दिपावलीच्या पार्श्वभूमीवर कोरोना प्रतिबंधक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून परिसरातील व्यावसायीकांची कोरोना तपासणी करण्यात येत असून आजअखेर सव्वाशे व्यापा-यांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.

ग्रामीण भागातही दिवाळीच्या खरेदीची धामधूम दिसून येत आहे. छोट्या-मोठ्या दुकानांमध्ये खरेदीसाठी गर्दी होवू लागली आहे. परिणामी कोरोनाचा पादुर्भाव पुन्हा वाढू नये, म्हणून आरोग्य विभागाकडून खबरदारी घेण्यात आली आहे. कोळेवाडी, कुसूर, तारूख, अंबवडे आणि या गावांच्या वाड्या वस्त्यांमध्ये असलेल्या लहान मोठ्या सर्व व्यवसायीकांची कोरोना तपासणी करण्यात आली.

परिसरातील मध्यवर्ती ठिकाण असलेली कोळेवाडी बाजारपेठ मोठी असल्याने याठिकाणी परिसरातील लोक खरेदीसाठी येतात. तर सर्व व्यवसायीकांना तपासणीसाठी सोयीचे ठिकाण असल्याने कोळे प्राथमीक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोळेवाडी येथे शिबिर घेवून तपासण्या केल्या. यामध्ये सर्वांचे अहवाल निगेटीव्ह आले. परिसरातील २१० व्यावसायीक आणि कामगारांचे रजिस्ट्रेशन करण्यात आले होते. त्यापैकी १२२ जणांनी तपासणी करून घेतली.

तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. संगीता देशमुख, कोळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षाली जगताप, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. दिपाली ताटे, डॉ. अनुजा धोकटे, आरोग्य सहायक पंकज नलवडे, लॅब टेक्नीशअन दिलीप जाधव, आरोग्य सेवक संतोष जाधव, युवराज शेवाळे, सेविका सुनिता पाटोळे, सुरेखा केदार, व्ही. एस. साळुंखे, भाग्यश्री पाटील तसेच अंबवडे, कोळेवाडी, कुसूर, तारूख, बामणवाडी, वानरवाडी आदी गावातील स्वयंसेवक उपस्थित होते.

कोळे आरोग्य केंद्राची दमदार कामगिरी

कऱ्हाड तालुक्यात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर या परिसरात वानरवाडी येथे सोळा बाधित रूग्ण सापडले होते. सर्व रूग्ण कोरोनावर मात करून घरी परतल्यानंतर दुसऱ्या दिवशीच तारूख येथे पहिला बाधित रूग्ण सापडला होता. त्यानंतर काही दिवसातच हॉटस्पॉट ठरलेल्या तारूख येथील बाधितांचा आकडा अर्धशतक पार गेला होता. या आकड्याने प्रशासनही हादरून गेले होते. मात्र, ते आव्हानही कोळे आरोग्य केंद्राने स्विकारून चांगली कामगिरी केली.

Web Title: Corona report of 500 traders negative, investigation in Kolewadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.