पालखी सोहळ्यापूर्वी कोरोना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:29 IST2021-06-04T04:29:13+5:302021-06-04T04:29:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क फलटण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी होऊ न शकलेल्या आषाढी वारीला यंदा पोषक वातावरण आहे का, गावात ...

पालखी सोहळ्यापूर्वी कोरोना
लोकमत न्यूज नेटवर्क
फलटण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी होऊ न शकलेल्या आषाढी वारीला यंदा पोषक वातावरण आहे का, गावात कोरोनाची परिस्थिती कशी आहे याबाबत श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे अध्यक्ष डॉ. अभय टिळक यांनी पालखी मार्गावरील गावांचे सरपंच व पालिका नगराध्यक्षांशी पत्रव्यवहार केला आहे. या गावांनी येत्या चार पाच दिवसांत आळंदी संस्थानला उत्तर द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पालखी सोहळ्याच्या वेळापत्रकानुसार यंदा दि. २ जुलै रोजी श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे पंढरीच्या दिशेने प्रस्थान होईल, तथापि कोरोना लसीकरण, प्रतिबंधात्मक उपाययोजना आदी परिस्थितीचा विचार करता यंदाच्या पालखी सोहळ्यासंदर्भात गावचे प्रतिनिधी या नात्याने आपली भूमिका जाणून घेणे संस्थान कमिटीस अगत्याचे वाटत आहे. त्यामुळे आपापल्या ठिकाणचा आढावा घेऊन त्याची माहिती संस्थानास द्यावी, असे या पत्रात नमूद केले आहे. सध्याची परिस्थिती व सोहळ्याचा मुक्काम आपल्या गावी असेल त्या वेळेची व संभाव्य परिस्थिती याचा साधकबाधक विचार करून आषाढी वारीचे स्वरूप यंदा कसे असावे याबाबत निर्णय घेतला जाईल.