कोरोना जागृतीसाठी विद्यार्थी सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:28 IST2021-06-06T04:28:45+5:302021-06-06T04:28:45+5:30

कोपर्डे हवेली गावात संबंधित प्राध्यापक व विद्यार्थ्यांकडून मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी प्रा. डॉ. तानाजी ...

Corona mobilized students for awareness | कोरोना जागृतीसाठी विद्यार्थी सरसावले

कोरोना जागृतीसाठी विद्यार्थी सरसावले

कोपर्डे हवेली गावात संबंधित प्राध्यापक व विद्यार्थ्यांकडून मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी प्रा. डॉ. तानाजी पाटील, प्रा. वंदना किशोर, प्रा. डॉ. कोमल कुंदप, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय चव्हाण, ग्रामविकास अधिकारी शिवाजी लाटे, कॉम्रेड गणेश चव्हाण, पोपट चव्हाण, माजी मुख्याध्यापक रघुनाथ चव्हाण, जयंत पाटील, महादेव चव्हाण, लहू पवार, विद्यार्थी साक्षी कुंभार, हेमांगी कुलकर्णी, ओंकार पाटील आदींची उपस्थिती होती.

यावेळी मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. कोमल कुंदप म्हणाल्या, कोरोना पॉझिटिव्ह म्हटले की, लोक निगेटिव्ह होतात. त्यासाठी कोरोनाची भीती डोक्यातून काढली पाहिजे. प्रत्येकाने काळजी घेत त्याच्यावर मात केली पाहिजे. कोरोनाचा रुग्ण सापडू नये, यासाठी सर्वांनी सामाजिक बांधीलकी जपत काम केले पाहिजे. कोरोना विषाणूला आपण आत्मविश्वासाने मारले पाहिजे.

प्रा. डॉ. तानाजी पाटील, प्रा. वंदना किशोर यांचे भाषण झाले. प्रास्तविक कॉ. गणेश चव्हाण यांनी केले. ग्रामविकास अधिकारी शिवाजी लाटे यांनी आभार मानले.

फोटो : ०५केआरडी०१

कॅप्शन :

कोपर्डे हवेली, ता. कऱ्हाड येथे प्रा. डॉ. कोमल कुंदप यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.

Web Title: Corona mobilized students for awareness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.