माजी सैनिकांकडून कोरोना हरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:29 IST2021-06-04T04:29:28+5:302021-06-04T04:29:28+5:30
पुसेसावळी : कोरोनाबाधित रुग्णांसाठी चोराडे येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये सुरू करण्यात आलेल्या आयसोलेशन सेंटरमध्ये दाखल असलेल्या माजी सैनिकांनी तेरा ...

माजी सैनिकांकडून कोरोना हरला
पुसेसावळी : कोरोनाबाधित रुग्णांसाठी चोराडे येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये सुरू करण्यात आलेल्या आयसोलेशन सेंटरमध्ये दाखल असलेल्या माजी सैनिकांनी तेरा दिवसांनी कोरोनावर यशस्वी मात केली.
चोराडे येथे लोकसहभागातून कोरोना रुग्णांसाठी १५ मे रोजी आयसोलेशन सेंटर सुरू केले आहे. या आयसोलेशन सेंटरमध्ये ७६ वर्षीय माजी सैनिक उपचारासाठी दाखल २० मे रोजी झाले होते. तेव्हापासून शासनाने दिलेल्या नियमांचे पालन केले व आयसोलेशन सेंटरमध्ये होत असलेल्या नियमित वैद्यकीय तपासणीमुळे तेराव्या दिवशी कोरोनावर यशस्वी मात करून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार घरी सोडले. कोरोनावर यशस्वी मात केल्यामुळे आज सर्व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये गुलाबपुष्प देऊन त्यांना निरोप देण्यात आला.
या वेळी चोराडे उपकेंद्राचे डाॅ. सुहास कुंभार, माजी व्हाईस चेअरमन शांताराम पिसाळ, सचिन पिसाळ, रवींद्र पिसाळ, अभिजित पिसाळ, उत्तम थोरात, सचिन पिसाळ, सुनील जानकर उपस्थित होते.